‘ही तुमची भाषा असू शकत नाही, तुम्ही संपादिका आहात…’, चंद्रकांत पाटील रश्मी ठाकरेंना लिहिणार पत्र (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन – तुम्ही संपादिका आहात..अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. आताही खा. संजय राऊत (Sanjay raut) यांच्या पत्नीला ईडीची नोटीस (ED notice)  आल्यावर जी भाषा वापरली तिथे रश्मी वहिनी असणार संपादकीय असू शकत नाही, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी याबाबत आपण थेट मुख्यमंत्र्याच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे (Editor Rashmi Thackeray) यांना पत्र लिहून विचारणा करणार असल्याचे सांगितले. यावेळी पाटील यांनी औरंगाबादच नामांतर संभाजीनगर करण्यासंबधीही भाष्य केले आहे.

चंद्रकांत पाटील पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही, तो आमचा श्रद्धेचा विषय आहे. तसेच निवडणुकीचा मुद्दा देखील नाही. अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाच नाव तरी कशाला? ते पहिले हटवा. संभाजी महाराजांचे नाव हे संभाजीनगर शहराला असणे याबाबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून भूमिका होती. पाच सहा महिन्यांपूर्वी जेव्हा मी संभाजीनगर नामांतर व्हावे असे म्हटले होते. तेव्हा सामनाने माझ्यावर अग्रलेख लिहिला होता, असे पाटील म्हणाले, त्यावेळी सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता, असे ते म्हणाले.

 

 

 

 

ज्यावेळी हे गोधड्या भिजवत होते तेव्हा बाळासाहेबांनी मागणी केली होती, असे ते म्हणाले. चांगले आहे, मग बाळासाहेबांनी केलेली मागणी धरुन धरा. हा काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद असून आम्हाला यात पडायचं नाही, असे पाटील यांनी सांगितले. नववर्षात अध्यक्ष म्हणून खूप प्रवास करुन संघटन मजबूत करण्याचा माझा संकल्प आहे. 14 हजार ग्रांमपंचायत निवडणुका 15 जानेवारीला आहेत. त्या अधिकाधिक जिंकाव्यात यासाठी प्रयत्न आहे. याशिवाय 2022 साली मुंबईसह पालिका निवडणुका लढवणे, जिंकणे हादेखील संकल्प आहे. तसेच त्यातही मुंबईवर दिल्लीचंही लक्ष राहील. मुंबईच्या पायाभूत समस्यांकडे दुर्लक्ष करणे आणि पैसे गोळा करण एवढेच लक्ष राहिले आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.