home page top 1

बीजेपी बदल रहा है ! काश्मीरमध्ये भाजपच्या झेंड्यातून ‘भगवा’ रंग गायब

श्रीनगर : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपकडून हिंदुत्वाचे कार्ड पुढे करण्यात येत असले तरी काश्मीरमध्ये भाजपच्या प्रचाराच्या जाहिरातीतून भगवेकरण गायब झाल्याचे दिसून येत आहे. श्रीनगर येथे भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भगव्या ऐवजी चक्क हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. त्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो छापण्यात आला आहे.

श्रीनगरमधील भाजपचे उमेदवार शेखर खालिद जहांगीर यांनी त्यांच्या हिरव्या रंगात आपल्या जाहिराती स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्या आहेत. या जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोही वापरण्यात आला आहे. भाजपचे नावही हिरव्या रंगात लिहिले आहे. तर पक्षाचे चिन्ह कमळ हे पांढऱ्या रंगात दिसून येत आहे. खोटे सोडा, खरे बोला आणि भाजपला मत द्या असा संदेशही उर्दु भाषेत या जाहिरातींद्वारे देण्यात आला आहे. काश्मीरच्या विकासासाठी खालीद जहांगीरला मत द्या. खालीद है तो सॉलिड है असे त्यात म्हटले आहे.

नॅशनल कॉन्फ्रेरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी भाजपच्या या जाहिरातबाजीवर टिका केली आहे. काश्मीरमध्ये पोहोचताच भगव्या रंगाची भाजपा हिरव्या रंगात बदलली. भाजपकडून मतदारांना मुर्ख बनविण्यात येत आहे. काश्मीरमध्ये प्रचारासाठी भाजप आपल्या खऱ्या रंगाचा वापर का करत नाही असा प्रश्न ओमर अब्दुल्ला यांनी ट्टिवर विचारला आहे.

ओमर अब्दुल्लांच्या प्रश्नाला उत्तर देताना खालिद जहांगीर याने म्हटले आहे की, सर रंग सोडून द्या, माणूस पहा, खालिद तुमचाच आहे. तसेच त्यांनी ओमर अब्दुल्लाचे आभारही मानले आहेत. ओमर अब्दुल्ला यांनी खालिदच्या उमेदवारीची दखल घेतल्यानंतर सर्वांचे लक्ष खालिदच्या उमेदवारीकडे गेले आहे.

Loading...
You might also like