सत्तास्थापना नव्हे तर ‘हे’ महत्वाचे मुद्दे HM अमित शहांच्या ‘रडार’वर

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये सत्तास्थापनेवरून लढाई सुरु असून दोन्ही पक्ष नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण सुरूच आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत हे आक्रमकपणे शिवसेनेची बाजू सांभाळताना दिसून येत असून भाजपचे अध्यक्ष आणि चाणक्य समजले जाणारे अमित शहा यांनी मात्र अजूनपर्यंत महाराष्ट्र्रात दखल दिलेली नाही. त्यामुळे ते नक्की काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष आहे, मात्र मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा या प्रकरणात लक्ष घालणार नसून त्यांचे संपूर्ण लक्ष्य सध्या राम मंदिर प्रकरण आणि नागरि दुरुस्ती विधेयक या मुद्द्यांवर आहे. त्यामुळे या मुद्द्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केल्याने महाराष्ट्राच्या प्रश्नात ते दखल देत नसल्याचे दिसून येत आहे. राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरीही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे अवघड जात आहे. त्यामुळे आज घडणाऱ्या घडामोडी या फार महत्वाच्या आहेत.

दरम्यान, हरियाणामध्ये झालेल्या सत्तास्थापनेच्या घोळामध्ये अमित शहा यांनी तात्काळ हस्तक्षेप करून तो तिढा सोडवला होता. मात्र यावेळी त्यांनी राज्यामध्ये लक्ष न दिल्याने हा तिढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील महाराष्ट्रात हस्तक्षेप करताना दिसून येत नाही. त्यामुळे राज्यातील नेत्यांची खऱ्या अर्थाने कसोटी आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके