
BJP Chitra Wagh | चित्रा वाघ यांचं आदित्य ठाकरेंना खरमरीत पत्र; म्हणाल्या – ‘तुमच्या वडिलांनी ‘ही’ वेळ आणलीय’
मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – BJP Chitra Wagh | राज्यात आरोग्य विभागाच्या परिक्षेत झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्याची तारांबळ उडाली. या पार्श्वभुमीवर विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) ताशेरे ओढले. यातच आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी ठाकरे सरकारला सवाल केले आहेत. चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे चिरंजीव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे.
सरकारच्या भोंगळ कारभारानं विद्यार्थ्यांचं स्वप्न धुळीस मिळाल्याचं चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी म्हटलं आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांचा आक्रोश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवा. कारण ते तुमच्याशिवाय कुणाचंही ऐकत नाही.
त्यामुळे वाघ डरकाळी फोडू शकतो हे दाखवून द्यावं असं आवाहन देखील त्यांनी आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) केले आहे.
चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) म्हणाल्या की, खरंतर तुम्हाला पत्र लिहून विद्यार्थ्यांची व्यथा मांडण्याची गरज नव्हती.
परंतु तुमच्या वडिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच ही वेळ आणली आहे. त्यांना तुमच्या शिवाय कोणाची चिंता नाही.
तुमच्याशिवाय कोणाचं ऐकत नाहीत म्हणून तुमच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना विनंती करते आहे.
वास्तविक मुलाच्या भवितव्यासाठी वडील किती कष्ट घेतात हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे.
तुमचे वडील स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री झाले. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आल्यावर मात्र ते गप्प बसलेत.
तेही जेव्हा विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळत आहे. असं पत्रातून म्हटलं आहे.
पुढे त्या पत्रात म्हटलं आहे की, मागील काही दिवसांपासून मी सातत्याने आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळ त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्यातील जनतेचे असंख्य विद्यार्थ्यांचे पालक आहेत.
हा विसर त्यांना कसा काय पडू शकतो. तर, न्यासा एजन्सीची चौकशी का लावली नाही?, एजन्सीला ब्लॅक लिस्टमध्ये का टाकलं नाही?
एजन्सीला परीक्षेचा अनुभव नसताना कंत्राट का दिले गेले?, MPSC सारखी विश्वासार्ह संस्था असताना न्याया एजन्सीच का निवडली? या प्रश्नांची उत्तरं सरकारने द्यावी.
खरंतर चार वेळा ठेच लागूनही पुन्हा पाचव्यांदा परीक्षा घेण्याची जबाबदारी त्याच एजन्सीकडे कशी काय दिली जाऊ शकते? यात तिन्ही पक्षात काही साटंलोटं झालंय का असा याचा संशय येतो.
Web Title : BJP Chitra Wagh | over controversy health department exam bjp chitra waghs letter minister aditya thackeray
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update