मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. तसेच न्यायालयाच्या निकालावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर (State Government) टीका केली होती. या टीकेला भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कायद्याची भाषा समजत नसेल तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे ट्युशन लावा, असा टोलाही चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
काल न्यायालयाने त्यांच्यासमोर जो पोपट ठेवला आहे, तो हलत नाही, डोळे उघडत नाही वगैरे सांगून तो मेलाय हे जाहीर करण्याचं काम फक्त विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) सोपवलं आहे. मेलेला पोपट हातात घेऊन मागून मिठूमिठू करणारी लोकं आहेत. तात्पुरतं जीवदान मिळाले आहे. मला वाटतं की महाराष्ट्राची ही अवहेलना थांबली पाहिजे. माझ्याप्रमाणे नैतिकतेला जागून या बेकायदेशीर सरकारने राजीनामा (Resignation) दिला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव जी, ज्या दिवशी तुम्ही राजीनामा दिला त्याच दिवशी महाविकास आघाडीचा पोपट मेला… सुप्रीम कोर्टानं पण तेच सांगितलंय…
तुम्हाला कायद्याची भाषा समजत नसेल तर आमच्या @Dev_Fadnavis जी यांच्याकडे ट्युशन लावा…@OfficeofUT @mieknathshinde @cbawankule @ShelarAshish @BJP4Maharashtra
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 12, 2023
कायद्याची भाषा समजत नसेल तर…
चित्रा वाघ म्हणाल्या, उद्धव जी ज्या दिवशी तुम्ही राजीनामा दिला त्याच दिवशी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) पोपट मेला. सुप्रीम कोर्टाने पण तेच सांगितलं. तुम्हाला कायद्याची भाषा समजत नसेल तर आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ट्युशन लावा, असा खोचक टोला वाघ यांनी लगावला. तसेच ज्यांची पक्ष प्रमुख पदाची नियुक्ती केंद्रीय निवडणूक आयोगानं बेकायदा ठरवली तेच ज्ञान पाजळताहेत की राज्यपाल नियुक्तीवर नियमावली आणावी. उद्धवा, अजब तुझा कारभार!, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
Web Title :- bjp chitra wagh replied Uddhav Thackeray over criticism on bjp after supreme court verdict
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Devendra Fadnavis | परमबीर सिंह यांचं निलंबन मागे, फडणवीस म्हणाले…. (व्हिडिओ)