गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकावरून भाजपचा ‘खुलासा’, खडसेंना दिलं ‘हे’ उत्तर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणं भाजपला जमलं नसल्याने भाजपमध्ये नाराज असलेल्या नेत्यांनी एकत्र येत आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. मागील पाच वर्षापासून नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांना भेटण्यामागचे कारण देखील खडसे यांनी सांगितले.
गोपीनाथ मुंडे याच्या स्मारकावरून त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकावरून राजकारण सुरु झालं. एकनाथ खडसे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रदेश भाजपने आता खुलासा केला आहे. तसेच भाजपने काही पुरावेही सादर करून एकनाथ खडसे यांना उत्तर दिले आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने या स्मारकासाठी काहीही केलं नाही असच एकनाथ खडसे यांना सुचवायचं होतं. त्यामुळे भाजपने त्यावर आज मोठा खुलासा केला आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. श्री गोपीनाथजी मुंडे यांचा उद्या जयंती दिन!
औरंगाबाद येथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे, यासाठी राज्यातील भाजपा सरकारने पुढाकार घेतला. 19 सप्टेंबर 2019 रोजी सिडकोने या स्मारकासाठी लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स दिले. pic.twitter.com/3htIXugaIb— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 11, 2019
भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. श्री गोपीनाथजी मुंडे यांचा उद्या जयंती दिन! औरंगाबाद येथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे, यासाठी राज्यातील भाजपा सरकारने पुढाकार घेतला. 19 सप्टेंबर 2019 रोजी सिडकोने या स्मारकासाठी लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स दिले. 25 नोव्हेंबर 2019 रोजी स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मारकाच्या कामाचा कार्यादेश (Work Order) सुद्धा देण्यात आला. हे स्मारक 2 वर्षात पूर्ण व्हावे, असे भाजपा सरकारनेच निश्चित केले होते. हे काम लवकर पूर्ण होऊन स्मारक आकारास येईल, अशी आशा करू या! असं ट्वीट करत त्यासंबंधीचे काही कागदपत्रही सादर केले आहेत.
25 नोव्हेंबर 2019 रोजी स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मारकाच्या कामाचा कार्यादेश (Work Order) सुद्धा देण्यात आला. हे स्मारक 2 वर्षात पूर्ण व्हावे, असे भाजपा सरकारनेच निश्चित केले होते. हे काम लवकर पूर्ण होऊन स्मारक आकारास येईल, अशी आशा करू या! pic.twitter.com/zU39Se6bN4
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 11, 2019
मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर खडसे म्हणाले होते, गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक आधीच करायला पाहिजे होतं. तशी मागणीही करण्यात आली होती. मात्र पुढे फार काही झालं नाही. या स्मारकासाठी औरंगाबाद इथ जागाही मागितली होती. हे स्मारक तातडीने पूर्ण करावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे स्मारक लवकर करु असे आश्वासन दिले आहे.
Visit : policenama.com
- पायी वेगाने चालण्याचे ‘हे’ आहेत तब्बल ३४ फायदे, वाचून व्हाल थक्क !
- मडक्यातील पाण्याचे ९ फायदे आणि फ्रिजच्या पाण्याचे ५ तोटे जाणून घ्या
- ‘सुपरफूड अॅवोकॅडो’! खाताना, खरेदी करताना, साठवताना ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
- लठ्ठपणाच्या दुष्परिणामांचे ‘हे’ आहेत २ मुख्य प्रकार, जाणून घ्या
- तुम्ही लठ्ठ आहात का ? ‘या’ २ पद्धतीने ओळखा, नेहमी लक्षात ठेवा या ४ गोष्टी
- काविळ, दम्यावर कांदा गुणकारी ! ‘हे’ आहेत 7 आरोग्यदायी फायदे