काळजीवाहू मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपा कोअर कमिटी राज्यपालांच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानावर चालु असलेली भाजपा कोअर कमिटीची बैठक काही मिनीटांपुर्वी संपलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोअर कमिटीचे सर्व सदस्य राज्यपाल भगतसिंग कोश्योरी यांना भेटण्यासाठी राजभवानाकडे रवाना झाले आहेत. बैठकीत नेमका काय निर्णय झाला हे काही वेळानंतर कळणार आहे.

भाजप नेते राज्यपालांना भेटून नेमकं काय सांगणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. भाजपा सत्ता स्थापन करणार की आणखी काय याबाबत भाजप नेते राज्यपालांना सांगणार आहेत.

Visit : Policenama.com