‘भाजप’नं बोलावली महत्वाची ‘बैठक’, ‘डॅमेज कंट्रोल’ ?

0
15
rekha jadhav
File Photo

जळगाव :  पोलीसनामा ऑनलाइन – भाजपची उत्तर महाराष्ट्रासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या स्थानिक नेत्यांमधील वाद चर्चेत राहिला. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होते याबाबात राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

भाजपच्या कोअर कमिटीच्या या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटनमंत्री विजय पुराणिक, एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील आमदार, खासदार आणि कोअर कमिटी सदस्य उपस्थित राहणार आहेत.

रोहिणी खडसे यांचा पराभव करण्यात आला असा आरोप एकनाथ खडसेंनी केल्याने हाच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे आजची बैठक भाजपसाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. या बैठकीचे विषय पक्ष संघटन, मागील निवडणूका आण पक्षांतर आहे.

ही बैठक जळगाव शहरातील बालांनी लॉनमध्ये आज दुपारी साडेबारा वाजता पार पडेल. या बैठकीकडे सर्वांची लक्ष लागून आहे. कारण भाजप डॅमेज कंट्रोल करण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद गमावल्यानंतर आणि भाजपची सत्ता गेल्यानंतर अनेक नाराज नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले. काही ज्येष्ठ नेत्यांनी तर फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त करत टीका देखील केली. पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबूकवर पोस्ट लिहित आपल्या समर्थकांत सूचक संदेश पोहचवला. त्यानंतर पंकजा मुंडे भाजपला रामराम ठोकणार अशी चर्चा रंगली. त्यानंतर आता भाजपचे अनेक नेते बंडाचा झेंडा उचलत आहेत असे दिसते. त्यामुळे आजच्या बैठकीत भाजपमधील नाराजी उफळून येण्याआधीच त्यावर मलमपट्टी करण्यात भाजपला यश येते का हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Visit : Policenama.com