पुणे : BMW साठी भाजप नगरसेविकेकडून सुनेचा छळ, पोलीस ठाण्यात FIR दाखल

पुणे/सांगवी : पोलीसनामा ऑनलाइन – सुनेचा शाररिक व मानसिक छळ करुण पैसे व महागड्या गाड्याची मागणी केल्याच्या आरोपावरुन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भाजप नगरसेविका आरती चौधे आणि त्यांचे चिरंजीव संकेत चौधेसह अन्य तीन लोकांच्या विरोधात सांगवी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 27 वर्षीय सुनेने तक्रार केली आहे.

पोलिसांनी नगरसेविका आरती चौधे, पीडीतेचा पती संकेत सुरेश चौधे, दीर विनय सुरेश चौधे आणि सासुचा भाऊ किशोर निम्हण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत आणि फिर्य़ादी यांचे तीन वर्षापूर्वी लग्न झाले आहे. लग्नानंतर बीएमडब्ल्यु गाडी आणि इलेक्शनमध्ये खर्चाकरीता पैसे दिले नसल्याच्या रागातून त्यांचा शारिरीक आणि मानसिक त्रास केला. तसेच फिर्य़ादी यांच्या दिराने त्यांचा वेळोवेळी विनयभंग केला. त्याला विरोध केला असता दिर विनय याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली.

फिर्य़ादी यांना सासरच्या लोकांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये फिर्यादी यांनी सासु, पती, दीर आणि सासुच्या भावाने आपला क्रूरपणे त्रास देऊन छळ केला. तसेच दिराने मनसा लज्जा निर्माण होईल असे वर्तन केल्याचे म्हटले आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.