मुरबाड : घरात घुसून महिलेचा विनयभंग करणाऱ्या भाजप नगरसेवकाला अटक

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – घरात घुसून महिलेचा विनयभंग करणाऱ्या भाजप नगरसेवकाला पोलिसांनी अटक केली आहे. नितीन तेलवणे असे अटक करण्यात आलेल्या मुरबाडच्या भाजप नगरसेवकाचे नाव आहे. तेलवणे याने एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा आरोप तेलवणे याच्यावर आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्याच्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनिल देशमुख यांनी ही धक्कादायक माहिती दिली.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणातून राजीनामा द्यावा लागला. हे प्रकरण ताजं असताना भाजप नगरसेवकाच्या अटकेचे वृत्त समोर आले आहे. नितीन तेलवणे हे मुरबाडचे भाजप नगरसेवक असून त्यांच्यावर महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे.

विधीमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांना आवर घालण्यापेक्षा सत्तारुढ पक्षाने आपल्याच सहकारी मित्रांची कोंडी केली आहे. विरोधकांना उत्तर देण्याच्या नादात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांनी काँग्रेसची कोंडी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात राज्यपाल बारा आमदार नाही तोपर्यंत मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळ आम्ही देणार नाही, असे विधान करुन काँग्रेसची मोठी अडचण केली.