हॉटेल चालकाला ५० हजारांची खंडणी मागणा-या नगरसेवकावर गुन्हा

नवी मुंबई : वृत्तसंस्था

नव्याने सुरु झालेल्या हॉटेलचालकाने खंडणी देण्यास नकार दिल्याने रागावलेल्या नगरसेवकासह त्याच्या समर्थकांनी हॉटेलमध्ये जाऊन तोडफोड केली. त्यात हॉटेलचालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी भाजप नगरसेवकाविरुद्ध खंडणी मागितल्याचा गुन्हा दखल केला आहे.

खारघरचे नगरसेवक शत्रुघ्न काकडे असे त्यांचे नाव आहे़ सेक्टर ४ मधील हॉटेल शानी बावर्ची येथे शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला होता. सेक्टर ४ मध्ये शानी बावर्ची हे हॉटेल नुकतेच सुरु झाले आहे़ त्याच्या मालकाकडे काकडे यांनी ५० हजार रुपयांची हप्ता मागितला होता. तो देण्यास त्यांनी नकार दिला़ तेव्हा काकडे व त्यांचे १५ समर्थक रात्री हॉटेलमध्ये गेले. त्यांनी हॉटेलचालक इमतियाज शेख व हॉटेलच्या कर्मचा-यांना मारहाण केली. हॉटेलमधील कर्मचा-यांनी पोलिसांना फोन केल्यावर काकडे व त्यांचे समर्थक पळून गेले. शेख यांच्या कानाला जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
[amazon_link asins=’B07BCCFBKZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e2deb475-9ec2-11e8-9188-27522a8c8e95′]