भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे पद रद्द

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड महापालिकाच्या चिखली प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव असलेल्या जागेवरील भाजपचे नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले असल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. यामुळे चिखलीत लवकरच पोटनिवडणूक लागणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b5f3652d-c96f-11e8-b0c9-6dc9dce09bbb’]

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली. या निवडणुकीत कुंदन अंबादास गायकवाड हे चिखली प्रभाग क्रमांक एक मधून भाजपच्या तिकीटावर विजयी झाले. त्यांनी कैकाडी जातीचा दाखला सादर करत अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार नितीन दगडू रोकडे यांनी कुंदन गायकवाड यांच्या जात दाखला आणि जात प्रमाणपत्र पडताळणीवर हरकत घेतली. गायकवाड यांचा जात दाखला अवैध असल्याचा निर्णय बुलढाणा जिल्हा विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मंगळवारी (दि.२९) दिला.

[amazon_link asins=’B076H51BL9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f8701db2-c96f-11e8-8762-290f0338e85f’]

जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून २० ठार

कुंदन गायकवाड हे कैकाडी जातीचे असून, ते सोलापूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. सोलापूर जिल्ह्यात कैकाडी ही जात विमुक्त जात या प्रवर्गात मोडते. कुंदन गायकवाड यांनी विमुक्त जात या प्रवर्गातून पुण्यात जमीन मिळविली आहे. त्याबाबतचे पुरावे जात पडताळणी समितीसमोर सादर करण्यात आले. त्या आधारे कुंदन गायकवाड यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बुलढाणा जात प्रमाणपत्र समितीने अवैध ठरविले होते. तसेच त्यांना अनुसूचित जातीचे दिलेले फायदे तत्काळ काढून घेण्याचे आदेशही दिले होते. त्याच प्रमाणे गायकवाड यांनी बनावट कागदपत्रे सादर करून जात पडताळणी समितीची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेशही दक्षता पथकाच्या पोलिस निरीक्षकांना दिले होते.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ca38c0fd-c96f-11e8-a76f-dbd37374575c’]

बुलढाणा जिल्हा जात पडताळणी समितीच्या या निर्णयाविरोधात कुंदन गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. नागपूर खंडपीठाने गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबर २०१८ पर्यंत स्थगिती आदेश दिले होते. त्यामुळे नगरसेवक गायकवाड यांना दिलासा मिळाला होता. परंतु, ही मुदत संपताच बुलडाणा जिल्हा जात पडताळणी समितीने २९ सप्टेंबर २०१८ रोजी नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र रद्द केल्याचा अंतिम निकाल दिला आहे. गायकवाड यांचा कैकाडी अनुसूचित जातीचा दावा समितीने अमान्य केला आहे. त्यांना अनुसूचित जातीचे म्हणून दिलेले फायदे तत्काळ काढून घेण्याचे  आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गायकवाड यांचे पद रद्द केले आहे.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d3ddeed3-c96f-11e8-87f5-871ca1a43eac’]

निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर म्हणाले, ‘ बुलढाणा जात पडताळणी समितीने नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले आहे. त्याबाबतचा अहवाल शुक्रवारी (दि.५) महापालिकेला प्राप्त झाला. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गायकवाड यांचे पद्द रद्द केले आहे. त्याबाबतचे आदेश पारित केला आहे. या आदेशाची प्रत गायकवाड, नगरविकास विभाग, राज्य निवडणूक आयोग आणि पालिकेच्या नगरसचिव विभागाला पाठविली आहे. गायकवाड यांना दिलेले सर्व भत्ते वसूल केले जाणार आहेत’.

नालासोपारा प्रकरणी : अमोल काळे, अमित बद्दी, गणेश मिस्त्रे यांना १२ ऑक्टोबरपर्यंत एटीएसची कोठडी