Pune News : चर्चा तर होणारच ! ’40 वर्षे सेवा करतोय हे आमच्या कुटुंबाचं चुकलं का?’ भाजपा नगरसेवकाचं होर्डिंग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – चिंचवडमध्ये एका भाजपा नगरसेवकांने लावलेले एक होर्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या होर्डिंगमध्ये नगरसेवकाने आपली पक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या 40 वर्षांपासून आमच कुटुंब भाजपाची सेवा करत आहे…हे आमचं चुकल का? सोयीचे राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केल हे आमच चुकलं का? अशी विचारणा नगरसेवकाने केली आहे. या फलकाची स्थानिक राजकारणात जोरदार चर्चा सुरू असून त्याचे पडसाद येणाऱ्या महापालिका निवडणुकीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्वाचे : चेक ट्रंकेशन (CTS) सिस्टमवर RBI चे निर्देश, तुमच्यावर होणार थेट परिणाम

पिंपरी- चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक रवी लांडगे यांनी हे होर्डींग लावून नाराजी दर्शवली आहे. नुकतीच महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यात त्यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांचे नाव डावलून स्थानिक कारभा-यांनी इतरांना अध्यक्षपद दिल्याने रवी लांडगे दुखावले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी शहरभर अशा आशयाचे फलक लावून भाजपशी निष्ठावान राहूनदेखील डावलल जात असल्याने उघड नाराजी व्यक्त केली आहे.

Read More…
शिवसेनेचा सामनामधून सवाल; ‘NIA ने उरी, पठाणकोट आणि पुलवामा हल्ल्यात काय तपास केला ?’
परमबीर सिंह ‘नाराज’; नवीन पदभार न घेताच रजेवर
LIC ची 29 कोटी पॉलिसीधारकांना मोठी भेट ! सुरू केली ‘ही’ नवी सुविधा, ‘पॉलिसी होल्डर्स’ला असा मिळणार फायदा, जाणून घ्या
‘माझ्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याला DGP, मुंबई CP का केलं?; IPS पांडे यांचा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ‘सवाल’
दिलासादायक ! सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे होणार खिशावरचा भार कमी अन् पैशांचीही बचत
घर बसल्या 10 हजार लावून सुरु करा ‘हा’ बिझनेस; दर महिन्याला होईल 30 हजारांची कमाई