भाजप नगरसेवकाचा हॉटेलमध्ये मृत्यू

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. परंतु त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती अद्याप समजू शकली नाही. कांबळे हे एका हॉटेलमध्ये काही दिवसांपासून वास्तव्यास होते. तेथेच त्यांचा एका खोलीत मृतदेह आढळून आला. त्यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

कांबळे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांबळे हे ठाण्यातील नौपाडा भागातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. गुरुवारी रात्री त्यांनी आपल्या घरी फोन करून आई आणि पत्नीशी संवाद साधला होता. तसेच त्यांनी पोटाचा त्रास होत असल्याची माहिती दिली होती.

शुक्रवारी सकाळी घरच्यांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी हॉटेलमध्ये धाव घेतली. ते ज्या रुममध्ये वास्तव्यास होते त्या रुमचा दरवाजा उघडा होता. आणि ते खाली पडले होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like