मदतीसाठी आलेल्यांना भाजप नगरसेविकेची मारहाण ; व्हिडिओ व्हायरल, नगरसेविकेची जाहीर माफी

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आलेल्यांना मदत करण्याऐवजी त्यांनी वस्तू देण्यास नकार दिल्याने भाजपच्या नगरसेविका गीता सुतार व कार्यकत्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, गीता सूतार यांनी आपल्यावरील आरोप नाकारले असून माझ्या प्रभागातील पूरग्रस्त लोकांची तक्रार आल्यानंतर विचारपूस करण्यासाठी आपण त्या ठिकाणी गेलो होतो. राजकीय वर्चस्वातून वादावादी झाली, असे सांगून आपल्यालाच मारहाण झाली असल्याचे सांगत त्यांनी आपली तक्रार नाही. पण कोणाची मने दुखावली असतील तर मी माफी मागते असा जाहीर माफीनामा त्यांनी प्रसिद्धीला दिला आहे.

याबाबतची माहिती अशी, सांगलीतील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात मदतीचे वाटप करण्यात येत होते. तेथे भाजपाच्या नगरसेविका गीता सुतार आणि त्यांचे पती सुयोग काही कार्यकर्त्यांना घेऊन गेले. त्यांनी तेथील कार्यकर्त्यांना चादरी आणि चटया मागितल्या. हे आपल्याकडून मदत घेऊन स्वत:च्या नावाने वाटतील असे या पदाधिकाऱ्यांना वाटल्याने त्यांनी त्यांना मदत देण्यास नकार दिला. तेथील पदाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही सरकारकडून घेऊन लोकांना वाटप करा. आम्ही आमच्या पद्धतीने लोकांना वाटप करत आहोत. त्यानंतर सुतार व त्यांचे पती सुयोग सुतार यांनी महिलांना मारहाण करत व अन्नधान्यासहित इतर साहित्यांची नासधुस केली. तसेच मदत कार्य करणाऱ्या लोकांना मारहाण केली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

गीता सुतार यांनी याचा इन्कार केला असून आपली कोणत्याही संस्था, राजकीय मंडळीबद्दल तक्रार नसून कोणाची मने दुखावली असतील तर मी जाहीर माफी मागते असे पत्रकात म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like