बाणेर येथील उद्यानाचे आरक्षण उठवण्यास भाजप नगरसेवकाचा विरोध 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पुण्यातील मौजे बाणेर येथील स.नं.35/1/2 या जागेवर जी 3 बागेचे आरक्षण प्रस्तावित आहे. मात्र संबंधित जागा मालक हे आरक्षण उठवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती समोर येत आहे. हे बागेचे आरक्षण कायम असावे. अशी मागणी भाजपचे स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तर या जागेचा सात बारा पोलीसनामाच्या हाती लागला आहे.
[amazon_link asins=’B07DX1K7CT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’33d9cb2a-8109-11e8-85a4-65245cbc40a0′]

या विषयी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले की, बाणेर येथील स.नं.35/1/2 या जागेवर जी 3 बागेचे आरक्षण प्रस्तावित आहे. या जागेवरील आरक्षण उठवण्याच्या हालचालींना मागील काही दिवसापासून वेग आल्याचे पाहाव्यास मिळत आहे. संबंधीत जागा मालकाने राज्य सरकारकडे ते आरक्षण हटवण्यासाठी अर्ज केला आहे. त्यावर माझा आक्षेप असून हे आरक्षण कोणत्याही परिस्थिती हटवता कामा नये. असे झाल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे निवदेनाद्वारे त्यांनी केली आहे.

संबंधीत बातमी-