पिंपरी : भाजप नगरसेविकेच्या मुलाने वडिलांच्या पिस्तुलातून गोळी मारुन केला आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी : वडिलांच्या पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून घेत भाजप नगरसेविकेच्या मुलाने आत्महत्येचा प्रयतन केला. प्रसन्ना शेखर चिंचवडे (वय २१, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रसन्ना हा भाजप नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांचा मुलगा आहे. ही घटना रविवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडली. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

प्रसन्ना याने कुटुंबियासमवेत रविवारी रात्री जेवण केले. त्यानंतर ताे त्याच्या खोलीत गेला. त्यानंतर गोळी झाडल्याचा आवाजा आला. त्यामुळे घरातील लोकांनी त्याच्या खोलीकडे धाव घेतली. खोलीत तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्याला तातडीने उपचारासाठी थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.