‘त्या’ नगरसेवकाच्या मुलाने शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलाची दुचाकी जाळली

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – जुन्या वादातून पिंप्राळा हुडकोमधील आजी-माजी नगरसेवकांमधील वाद पुन्हा उफाळून आला आहे. यामध्ये माजी नगरसेवकाचा मुलगा जाकीर खान रसूल खान याची बुलेट पेट्रोल टाकून जाळण्यात आली. याप्रकरणी भाजपा नगरसेवकाचा मुलगा शफी शेख शरीफ (रा. हुडको), मोसीन उर्फ विंचू अय्युब खान व अफसर शेख अनवर भिस्ती या तिघांविरुद्ध रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंप्राळा हुडको भागात भाजपा व शिवसेनेच्या माजी नगरसेवकांमध्ये वाद आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा मुलगा जाकीर खान याने शनिवारी रात्री साडेनऊ वाजता त्याची बुलेट घराजवळ लावली होती. त्यावेळी गाडी जाळल्याचे सैय्यद शोहेब सय्यद अमिन व सैय्यद ईस्माईल लियाकत अली यांना ही बाब लक्षात आली.

मोसीन उर्फ विंचू व त्याच्यासोबत दोन जणांनी जाकीर खान रसूल खान यांच्या दरवाजाला लाथा मारल्या. कंपाऊडमधील माठ फोडून, सामानाची फेकाफेक केली व यानंतर बुलेटवर पेट्रोल टाकून पेटूवन दिले, असे शेजारी रहिवासी सैय्यद शाहेब सैय्यद अमिन व सैय्यद ईस्माईल लियाकत अली यांनी जाकीर खान यांनी सांगितले. दुचाकी जाळल्यावर तिघं जण दुचाकीवरुन पळून गेले. यावेळी संशयितांच्या हातात धारदार शस्त्र व पेट्रोलची बाटली होती असेही फिर्यादीत नमूद आहे. या घटनेत ७० ते ८० हजाराच्या दुचाकीचे नुकसान झाल्याचे त्यात नमूद आहे. सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे तपास करीत आहेत.