पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला धक्का; ‘या’ नेत्याचा चिरंजीव राष्ट्रवादीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमधून मातब्बरांचे आऊटगोईंग सुरु असतानाच इनकमिंग सुरु असलेल्या भाजपला पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार झटका बसला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी आज भोसरी येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

राज्यात लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षातील उमेदवारांनी पक्षांना रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा धडाका लावला आहे. त्यात राष्ट्रवादीला राज्यात रणजितसिंह मोहिते पाटील आणि कॉंग्रेसला सुजय विखे यांचा झटका बसलेला आहे. पार्थ पवार यांची उमेदवारी मावळमधून जाहीर केल्यानतंर पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते व एकेकाळचे सहकारी आझम पानसरे यांनी शरद पवार यांची अचानकपणे रविवारी भेट घेतली होती. या भेटीमुळे शहराच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. तत्पुर्वी अजित पवार यांनीही आझम पानसरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते.

मात्र, या भेटीमागचे खरे गमक आज उमगले आहे. आझमभाई पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भोसरीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निहाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us