भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले – ‘दुसऱ्यांना सल्ला देण्यापेक्षा स्वत:ची मानसिकता बदला’

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येला ब्रेक लागला होता. परंतु, आता पुन्हा एकदा बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. दुसरीकडे लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध लागू करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता काही कठोर निर्णय घेण्याच्या सूचना देत शासकीय कार्यालयीन कामाकाजाची वेळ बदलण्याची भूमिका मांडली. त्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी व्टिट करुन थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मंत्रालयात न जाता घरात बसून राज्याचा कारभार करणारे मुख्यमंत्री शासकीय कर्मचाऱ्यांना १० ते ५ ही मानसिकता बदलण्याचा सल्ला देत आहे.. अहो, आधी तुमची मानसिकता बदलायला हवी… मग, इतरांना सल्ला द्या अशा शब्दात भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी नीती आयोगाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येबाबत चिंत व्यक्त केली तसेच १० ते ५ या पारंपारिक कार्यालयीन वेळेची मानसिकता बदलून केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण आखत वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे म्हंटले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रश्नावरून भाजपकडून टीका होत असते. त्यातच कोरोनाची भर पडली. कोरोना काळात मुख्यमंत्री फिल्डवर न जाता घरातून कामकाज करतात, सर्वसामान्यांना होणारा त्रास पाहण्यासाठी मुख्यमंत्री कधीही घराबाहेर न येता केवळ फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत होते. मातोश्रीत बसून सरकार चालवल जातय असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. त्यामध्ये आता कार्यालयीन कामाकाजची वेळ बदलण्याचा भूमिकेतवरही भाजपने टीका टिप्पणी केली आहे.

पाच दिवसांत लोकलच्या प्रवासीसंख्येत २ लाखांची घट
कोरोनामुळे मुंबईची लाईफ लाईन अर्थात लोकल सर्वसामान्यांसाठी बंद केली होती. दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर वारंवार लोकल सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली होती. ही मागणी दोन महिन्यानंतर पूर्ण करत १ फेब्रुवारीपासून ठरावीक वेळेतच सर्वसामान्यांसाठी लोकस सुरु करण्यात आली होती. मात्र, गेल्या चार – पाच दिवसांपासून पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम थेट पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील प्रवासीसंख्येवर झाला आहे. मागील पाच दिवसांत प्रवासीसंख्येत एकूण २ लाखांची घट झाली आहे.

पश्चिम रेल्वेवरील लोकलमधून १५ फेब्रुवारी रोजी प्रवास करणाऱ्यांची संख्या १७,५९,१२३ इतकी होती. तर १९ तारखेला ती १६,८८,२६० पर्यंत खाली आली. तर मध्य रेल्वेवर १५ फेब्रुवारीला २३,३९,१३१ अशी प्रवासीसंख्या होती. त्या तुलनेत १९ फेब्रुवारीला प्रवासीसंख्या २० लाखांपर्यंत आली म्हणजे साधारण दीड लाखांची घट झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.