बिहार निवडणुकीत सेनेला नोटापेक्षा कमी मते, भाजपकडून खिल्ली !

बिहार : पोलीसनामा ऑनलाइन – अख्ख्या देशाचे लक्ष मंगळवारी बिहार विधानसभा निवडणूक (Bihar Election) निकालाकडे लागले होते. निवडणुकीत सत्ताधारी जनता दल (JDU) आणि भाजपला पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी बिहारी जनतेने कौल दिला आहे. परंतु या निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी 23 जागा लढवणा-या शिवसेनेचे पानिपत झाले आहे. त्यांना एक टक्क्यापेक्षा कमी मते मिळाल्याने त्यांच्यावर (bjp-criticizes-shiv-sena-getting-very-few-votes-bihar) चौफेर टीका होत आहे.

राजदने तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली 75 आमदार निवडून आणून जोरदार मुसंडी मारली होती. परंतू जदयु आणि भाजपच्या झंझावतासमोर त्याचा टीकाव लागला नाही. एनडीएला 125 जागा मिळाल्या आहेत. परंतु एनडीएतून बाहेर पडलेल्या आणि महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवणा-या शिवसेनेने बिहारमध्ये 23 जागा लढविल्या होत्या. सेनेला फक्त 0.05 मते मिळाली आहेत. ही टक्केवारी नोटाला मिळालेल्या मतापेक्षाही कमी आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेवर टीका करण्याची एवढी मोठी संधी सोडणार तरी कसा. भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांनी शिवसेनेवर टीका करत ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, बिहार मे चमत्कार की बाते करनेवाली शिवसेना का डिपॉजिट गायब.एक टक्का व्होट भी नही मिले. बिहारमध्ये सेनचे डिपॉजिट गुल,एक टक्का मते पण मिळाली नाही. उध्दव ठाकरे आणि संजय राऊत कुठे आहे आपला चमत्कार अशी टीका केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करण्यात आले आहे. तो शब्द पाळला गेला नाही आणि महाराष्ट्रात राजकीय महाभारत घडले. आता कमी जागा मिळूनही नितीश कुमार यांना दिलेला शब्द पाळला गेला, तर त्याचे श्रेय शिवसेनेला द्यावे लागेल. बिहारमध्ये नेमके काय होईल हे पुढच्या 72 तासांत स्पष्ट होईल, असा टोला सामना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.