भाजपकडून भंडारा-गोंदिया लोकसभेचा उमेदवार जाहिर

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पक्षाकडून आज (रविवारी) लोकसभा निवडणुकीसाठी 9 उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया लोकसभेच्या उमेदवाराचे नाव जाहिर करण्यात आले आहे. राज्यातील जवळपास सर्वच मतदार संघातील उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आलेली आहेत. भाजप आणि शिवसेना कोल्हापूरमधुन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे.

भंडारा-गोंदियातून भाजपने सुनिल बाबुराव मेंढे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. अद्यापही माढा लोकसभा मतदार संघातुन भाजपने उमेदवारी जाहिर केलेली नाही. माढा लोकसभा मतदार संघातुन कोणाचे नाव जाहिर होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरवातीला शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातुन निवडणुक लढविणार अशी घोषणा केली होती. मात्र, शरद पवार यांनी माढयातुन माघार घेतली. तेथे राष्ट्रवादीकडून संजयमामा शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता माढा लोकसभा मतदार संघातील निवडणुक लक्षवेधी ठरणार आहेत.