14 महिने अन् 7 राज्य ! राजस्थान – MP पासून झारखंड-दिल्ली पर्यंत, BJP च्या पराभवाचा ‘घटनाक्रम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिसेंबर 2018 पासून भाजपला विधानसभा निवडणूकांत सतत हार पत्करावी लागली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूकीत भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली होती. अमित शाहांपासून जे. पी. नड्डांपर्यंत सर्वांचे प्रयत्न विफल ठरले. दिल्लीतील पराभवासह मागील 14 महिन्यांत भाजपला सात राज्यांत पराभव पक्तरावा लागला.

दिल्ली विधानसभा निवडणूकीत एकूण 70 जागांवर निवडणूका पार पडल्या त्यात ‘आप’ला 62 तर भाजपला फक्त 8 जागांवर समाधान मानावे लागेल. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. या प्रकारे दिल्लीतील 22 वर्षांचा वनवास संपवण्याचा प्रयत्नात असलेल्या भाजपाचा मोठा पराभव झाला. असे असले तरी दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांना भाजप 48 जागांवर विजयी होईल अशी अपेक्षा होती परंतु ते देशाचा नकाशा बदलू शकले नाहीत.

नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर देश भाजपमय झाला होता. 2014 मध्ये भाजपचे सरकार फक्त 7 राज्यात होते. 2015 साली 13 राज्यात भाजपची सत्ता होती तर 2016 मध्ये 15 राज्यात भाजप सत्तेत आले. 2017 साली 19 राज्यात भाजप पसरले होते आणि 2018 मध्ये भाजप 21 राज्यात सत्तेत होते. परंतु भाजपने जी प्रचाराची पद्धत इतर राज्यात वापरली तीच पद्धत भाजपने दिल्लीत वापरली आणि हीच भाजपची चूक ठरली.

भाजपचा पराभवाची सुरुवात 2018 च्या अखेरीस राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ विधानसभा निवडणूकीपासून झाली. राजस्थात 5 वर्ष तर दुसऱ्या दोन राज्यात 15 वर्ष भाजपची सत्ता होती. या तिन्ही राज्यात भाजपला काँग्रेसकडून जोरदार पराभव स्विकारावा लागला. या तिन्ही राज्यातील निवडणूकीपूर्वी भाजपला कर्नाटकात देखील झटका बसला होता. येथे काँग्रेस, जेडीएसने मिळून सत्ता स्थापन केली होती पंरतु जेडीएसच्या बंडखोर नेत्यामुळे तेथे पुन्हा भाजपला कमळ फुलवता आले.

आंध्र प्रदेशात भाजप आणि टीडीपीची आघाडी होते. परंतु 2018 पूर्वी ही आघाडी तुटली आणि चंद्रबाबू नायडू भाजपपासून वेगळे झाले. 2019 मध्ये लोकसभेसहित ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्रप्रदेशात विधानसभा निवडणूका पार पडल्या. ज्यात अरुणाचल प्रदेश सोडून इतर दोन्ही राज्यात भाजपला झटका बसला.

2019 मध्ये अखेर महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूका झाल्या होत्या, या तिन्ही राज्यातील भाजपकडे होती, ज्यातील हरियाणात जेजेपीच्या समर्थनात भाजपला सत्तेत येता आले मात्र महाराष्ट्रात शिवसेनेने साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह महाविकासआघाडी केल्याने येथे भाजपला आपली सत्ता गमवावी लागली, झारखंडमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आणि सत्ता देखील गमवावी लागली.