अनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’ मधील ‘या’ सीनमुळे भाजपकडून FIR

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या समोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. ते आता पुन्हा एकदा एका नव्या वादात अडकताना दिसत आहेत. दिल्लीमधील भाजपचे प्रवक्ते तजिंदर बग्गा यांनी नुकत्याच प्रकाशित झालेल्या अनुराग कश्यप दिग्दर्शित सेक्रेड गेम्स २ मधील एका सीनबद्दल तक्रार दिली आहे.

काय आहे वादग्रस्त सीन :
या सीनमध्ये शीख तरूणाची भूमिका साकारणारा सैफ अली खान स्वत: च्या हातातून कडं बाहेर पडून समुद्रात फेकतो. बग्गा यांनी आपल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, ‘हातातील कडं ही शीख धर्मातील एक पवित्र आणि अविभाज्य वस्तू मानली जाते आणि ती पूर्ण आदर आणि श्रद्धेने परिधान केली जाते’.

या मालिकेत दिग्दर्शकाने या कड्याचा आणि पर्यायाने शीख समुदायाचा अपमान केल्याचे बग्गा यांनी आपल्या पोलिस तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीत असा दावा केला आहे की आरोपीने शीख समुदायाची भावना भडकवण्यासाठी या वेबसीरीजमध्ये मुद्दाम हा सीन घातला आहे जेणेकरून समाजातील धार्मिक गटांमध्ये द्वेष निर्माण होईल. भाजप नेत्याने अनुराग कश्यपविरोधात कलम भादंवि २९५-ए, १५३, १५३-ए, ५०४, ५०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी अकाली दलाचे खासदार मनजिंदरसिंग सिरसा यांनीही नेटफ्लिक्सला हे वेब साइट्सवरून काढून टाकण्याची धमकी दिली होती.

विशेष म्हणजे दिग्दर्शक अनुराग कश्यप मागील काही काकाळापासून सतत वादात आहेत. १० ऑगस्ट रोजी त्यांनी आपले ट्विटर हँडलही डिलीट केले. कश्यपने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिले आहे – ‘जेव्हा आपल्या पालकांना फोनवर आणि मुलीला ऑनलाईन धमक्या मिळू लागतात तेव्हा तुम्हाला माहिती आहे की कोणालाही बोलायचे नाही. येथे कोणतेही कारण किंवा तर्काला काही अर्थ नाही. ठग शासन करतील आणि ठग हीच जीवनशैली होईल.

या नवीन भारताबद्दल सर्वांचे अभिनंदन. आशा आहे की आपण सर्वांची भरभराट होईल.’ या निर्णयावर कोलकातामधील काही प्रसिद्ध व्यक्तींनी एक खुले पत्र लिहून म्हटले आहे की, अनुराग सारख्या लोकांच्या अभिव्यक्तीला लक्ष्य बनविणे कोणत्याही लोकशाहीसाठी चांगले नाही आणि लोकांनी या द्वेषमूलक संस्कृतीविरूद्ध आवाज उठवला पाहिजे.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like