डॉक्टरपेक्षा कम्पाऊंडरला जास्त कळतं, संजय राऊतांच्या वक्तव्यानं नवं वादंग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. अशातच डॉक्टरांपेक्षा कम्पाऊंडरला जास्त कळतं असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राऊतांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले असून विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी हे वक्तव्य करुन कोरोना योद्ध्यांचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं ? ती सीबीआयसारखी आहे.

जागतिक आरोग्य संघटना म्हणजे इकडून तिकडे गोळा केलेल्या माणसांचा एक गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं ? खरंतर डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नाही. कम्पाउंडरकडून औषध घेतो. त्यांना जास्त कळतं. तुम्ही त्या WHO वाल्यांच्या नादाला लागू नका. त्यांच्यामुळंच कोरोना वाढल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. कोरोना संकटात डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. त्यांच्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले होते. तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यांचे आभार मानले होते. त्यांचा कोरोना योद्धे म्हणून गौरव केला आहे. असे असताना संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टर हे देवदूत म्हणून काम करत आहेत. त्यांच्याबद्दल राऊत यांनी असे वक्तव्य करणं म्हणेज डॉक्टरांचा फार मोठा अपमान आहे. त्यामुळे राऊत यांनी राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील डॉक्टरांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like