CM उद्धव ठाकरे आणि HM अनिल देशमुख यांची नार्को टेस्ट करा – भाजपा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाली की, जर दोघे खोटे बोलत नाहीत तर त्यांनी नार्को टेस्टसाठी जावे.

न्यूज एजन्सी एनएनआयशी बोलताना कदम म्हणाले की, ”जर ते सत्य सांगत असतील तर त्यांनी नार्को टेस्टसाठी जायला हवे, सर्व काही स्पष्ट होईल. सीताजींनाही अग्निपरीक्षेतून जावे लागले होते. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जायला का घाबरत आहेत?” भाजपच्या आमदाराने विचारले, परमबीर सिंग यांनी त्यांच्या बदलीनंतर हे पत्र लिहले. त्यामुळे या पत्रामागील त्यांचा हेतू काय होता हे आम्हाला माहिती असले पाहिजे. त्यांच्यावर राजकीय दबाव काय होता?

शरद पवारांनी आपले विधान का बदलले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले की त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्याना धमकी का दिली? त्यानंतर त्यांनी देशमुखांच्या विरोधात सिंग यांच्या आरोपावर आपले विधान बदलले. एका ट्विटमध्ये भाजपच्या आमदारांनी म्हंटले, ‘काल दुपारी शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्याबद्धल सांगितले की आपल्यावरील आरोप गंभीर आहेत. मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील. परंतू काही तासांनी शरद पवार देशमुखांच्या बचावास आले.’

ते म्हणाले, ”संपूर्ण देश हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे की दुपारी दोनपासून रात्रीपर्यंत असे काय झाले ज्यामुळे शरद पवारांनी आपले वक्तव्य बदलले? काय अनिल देशमुखांनी धमकी दिली की एनसीपीचे मोठे चेहरे पण यामध्ये समाविष्ट आहेत? कदम यांनी पुढे विचारले, ”शरद पवारांना असे म्हणायचे होते का की ते देशमुखांविरोधात कारवाई करणार नाहीत?”

शरद पवारांनी केला देशमुखांचा बचाव
भाजपने देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली तेव्हा पवार म्हणाले की, ”जर तुम्ही माजी आयुक्तांचे पत्र पहिले तर त्यात ते उल्लेख करतात की फेब्रुवारीच्या मध्यात त्यांना काही अधिकाऱ्यांद्वारा सांगितले गेले होते की त्यांना गृहमंत्र्यांकडून असे निर्देश मिळाले आहेत… १६ फेब्रुवारीला देशमुख यांना कोरोनाच्या कारणाने रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते. पवार म्हणाले, ”हे स्पष्ट आहे की ज्या वेळेमध्ये आरोप लावले गेले तेव्हा अनिल देशमुख रुग्णालयात दाखल होते.”

१०० करोड रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप
परमबीर सिंग यांनी शनिवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून देशमुख यांनी मुंबई पोलिसांचे निलंबित अधिकारी सचिन वाजे यांना प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्यासाठी पाठवले असल्याचा आरोप केला. सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर दुसऱ्या दिवशी देशमुख म्हणाले होते की सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून काढून टाकण्यात आले होते. जेणेकरून वाजे यांच्याशी संबंधित प्रकरणांची चौकशी कोणत्याही अडथळ्याशिवाय होऊ शकेल.