‘त्या’ विधानावर भाजपने हात झटकले ! नारायण राणेंची झाली ‘गोची’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीनंतर भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार स्थापनेबाबत नारायण राणे यांनी केलेला दावा फेटाळून लावत सरकार स्थापनेबाबतचे त्यांचे ते व्यक्तीगत मत असल्याचे मुनगंटीवारांनी सांगितले. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सत्ता स्थापन करण्यासाठी फक्त 145 चा आकडा आणयचा आहे. त्यासाठी मी प्रयत्न करतो. भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली होती. यावर ती त्यांची वैयक्तीत प्रतिक्रिया असल्याचंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. तसेच आम्ही कोणत्याही पर्यायाचा शोध घेतला नाही पण आमच्या मित्र पक्षाने इतर पर्यायाचा विचार केला असल्याचा टोला शिवसेनेचे नाव न घेता लगावला.

काय म्हणाले नारायण राणे ?
नारायण राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान त्यांनी सत्ता स्थापनेसाठी प्रतत्न करु असे सांगितले. त्यामुळे भाजप सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार आहे. लवकरच भाजपचं सरकार स्थापन होईल. भाजपची सत्ता येण्यासाठी जे करावं लागेल ते मी करेन. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भाजप सरकार स्थापन करणार असून कामाला लागा असे सांगितले असल्याचे नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like