स्थानिक पातळीवरही शिवसेना-भाजप ‘विभक्त’, औरंगाबादमधून सुरुवात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या वादामुळे भाजप-शिवसेना युतीमध्ये फुट पडली. त्यानंतर याचा परिणाम स्थानिक संस्थामध्ये दिसून आला. आत्तापर्य़ंत युतीचा गड समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद महापालिकेतही याचे पडसाद उमटले आहेत. भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. औताडे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतच राजीनामा देत असल्याची घोषणा केली.

मागील तीस वर्षापासून औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता आहे. मात्र, राज्यातील समिकरणे बदल्याने औरंगाबाद महापालिकेत देखील याचे पडसाद उमटले आहेत. पाच महिन्यानंतर महापालिकेची निवडणुक होत असून या निवडणूकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

राज्यातील भाजप शिवसेना युती तुटल्याचे पडसाद स्थानिक संस्थांवर होताना दिसून येत आहेत. मागील अनेक वर्षापासून एकत्र लढलेले दोन्ही पक्ष येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढताना दिसणार आहेत. याची सुरुवात औरंगाबादमधून झाली आहे. राज्यातील अनेक जिल्हा परिषदा, नगर पालिका, महानगरपालिकेत दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत आले आहेत. मात्र, आता राज्यातील समिकरणे बदल्याने शिवसेना-भाजप विभक्त होताना दिसत आहेत. भाजप मित्र पक्ष गेला तरी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन नवीन मित्र मिळाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला स्थानिक संस्थामध्ये सत्ता टिकवणे अवघड जाणार नाही.

शिवसेना-भाजप नगरसेवकांत जुंपली
औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेना-भाजपची मागील तीन दशकांपासून सत्ता आहे. मात्र, राज्यातील समीकरणे बदल्याचे पडसाद औरंगाबाद महानगरपालिकेत दिसून आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आज पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता. यावरून भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. त्यामुळे शिवसेना-भाजप नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली.
म्हणून माझा उपमहापौरपदाचा राजीनामा

आज औरंगाबाद महानगरपालिकेत सर्वसाधारण सभा सुरु झाली, तेव्हा भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी नेहमीप्रमाणे महापौरांच्या खुर्चीजवळ जाऊन बसणं नापसंत केले व ते नगरसेवकांमध्ये समोर जाऊन बसले. याप्रकारानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले, नागरिक आम्हाला विचारत आहेत की तुम्ही एकत्र निवडणूक लढवली मात्र आता तुम्ही सत्तेत एकत्र नाही, मग तुम्ही औरंगाबाद महापालिकेत एकत्र कसे ? या प्रश्नावर उत्तर म्हणून मी माझ्या उपमहापौरपदाचा राजीनामा देत असल्याचे औताडे यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/