कर्नाटक पोटनिवडणुकीच्या निकालांवरुन PM मोदींनंतर फडणवीसांचाही शिवसेनेवर ‘निशाणा’, म्हणाले …

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जनादेश व जनतेच्या इच्छेविरोधात जाण्याचे परिणाम कर्नाटक निकालांनी दाखवून दिले आहेत. जनतेने नाकारलेले पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र येतात, जनादेशाचा अपमान करून संधीसाधू राजकारण करतात, त्यानंतर पहिली संधी मिळताच जनता त्यांना कसा धडा शिकविते, याचे उदाहरण आज कर्नाटकच्या जनतेने दाखवून दिले आहे. असं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

मोदींचीही शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका –
कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘कर्नाटकात जनतेच्या जनादेशाचा विजय झाला आहे. काँग्रेस आता लोकांची विश्वासघात करु शकणार नाही. हा संदेश संपूर्ण देशात गेला असेल की जर कोणी जनतेच्या पाठित खजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तर संधी मिळताच जनता त्यांना शिक्षा देते. कर्नाटकच्या जनतेने आघाड्याच्या नव्हे तर एका मजबूत आणि स्थिर सरकारला बळ दिलं आहे.’

कर्नाटक विधानसभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणीत भाजपने आघाडी घेतली आहे. काँग्रेसने पराभव मान्य केला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला जास्त जागा मिळाल्या होत्या मात्र बहुमताला काही जागा कमी पडत होत्या. त्यामुळे काँग्रेसने जेडीसला समर्थन दिलं आणि कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. मात्र हे सरकार फार काळ टिकलं नाही.

काँग्रेस-जेडीएसच्या 17 बंडखोर आमदारांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्यामुळे कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले होते. यामुळे येडियुरप्पा सरकार बहुमतात आले आणि त्यांनी सरकार स्थापन केले. दरम्यान, हायकोर्टाने 2 जागांवरील निवडणूक स्थगित करीत इतर 15 जागांवर निवडणुकीला परवानगी दिली होती. त्यानुसार, या जागांवर नुकतीच पोटनिवडणूक पार पडली होती. त्यात भाजपने विजय मिळवला.

Visit : Policenama.com