‘राजगृह’ तोडफोड प्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करा : देवेंद्र फडणवीस

पोलिसनामा ऑनलाईन – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर काल संध्याकाळी अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यानंतर सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याप्रकरणी निषेध नोंदवला असून आरोपींना तत्काळ अटक केली जावी अशी मागणी केली आहे.

 

 

 

फडणवीस यांनी ट्विट करीत, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे. मी स्वतः मा. भीमराव (दादासाहेब) आंबेडकरजी यांच्याशी फोनवर चर्चा केली तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.