खडसेंची फडणवीस आणि महाजनाबरोबर ‘चाय पे चर्चा’, परंतु ‘नाराजी’ नाट्य कायम

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे नाराज केले एकनाथ खडसे यांनी आरोप केला होती की देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी माझे विधानसभेचे तिकिट कापले. परंतु त्यांनी दुसऱ्याच दिवशी यू टर्न घेतला आणि माझात आणि गिरीश महाजन यांच्यात सर्व काही अलबेल असून मी आरोप नाही तर नाराजी व्यक्त केली असे सांगितले. त्यानंतर आज शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंची भेट घेतली. यावेळी महाजन देखील उपस्थित होते.

एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये जैन इरिगेशन गेस्ट हाऊसवर ही चर्चा जवळपास अर्धातास चालली. परंतु या चर्चेदरम्यान खडसेंनी आपल्या नाराजीबाबत मौन बाळगले. जिल्हा परिषद निवडणूकीसंदर्भातील सभा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस जळगावात दाखल झाले होते. तर खडसेंनी सांगितले की माझ्या नाराजीबाबत कोणतीही चर्चा या बैठकीत झाली नाही.

एकनाथ खडसे यावेळी म्हणाले की जिल्हा परिषदेच्या निवडणूकीबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. चंद्रकांत पाटलांकडे आम्ही उमेदवारांची नावे पाठवली होती. या संदर्भात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्च करणार असल्याचे चंद्रकांत पाटलांना सांगितले होते. त्यानुसार आमची चर्चा झाली. इतर विषयावर आम्ही बोललो नसल्याचे खडसेंनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी खडसेंना फडणवीस यांच्यावर आणि महाजन यांच्यावर आरोप लावला होता, यावर फडणवीस जळगावच्या दौऱ्यावर असताना काहीतरी भाष्य करतील असे वाटले होते परंतु फडणवीस यांनी माध्यमांशी बोलणे टाळले आणि थेट हॅलिकॉप्टरमध्ये बसून धडगावकडे रवाना झाले.

खडसेंच्या नाराजीवर चर्चा नाही –
या भेटीनंतर खडसेंन माध्यमांशी बोलताना सांगितले की केवळ जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसंदर्भात बैठकीत चर्चा झाली. परंतु नाराजीवर प्रश्न विचारल्यावर त्यांनी मौन बाळगले. त्यामुळे नाराजी कायम आहे असे चित्र दिसत आहे.

बुधवारी खडसेंना आरोप केला होता की विधानसभा निवडणुकीवेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनीच जाणीवपूर्वक माझे तिकीट कापले. त्यांना माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणायची होती.

त्यानंतर गिरीश महाजन यांनी गुरुवारी यावर भाष्य करत सांगितले की खडसेंच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही, त्यांनी चूकीच्या माहितीच्या आधारे बोलणे योग्य नाही. परंतु त्यानंतर पार पडलेल्या जि. प. अध्यक्ष निवडीसंदर्भात भाजपची बैठक झाली त्यात खडसे – महाजन मांडीला मांडी लावून बसले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/