भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याला २ लाखांची लाच घेताना अटक

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन

‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ या पंतप्रधान मोदींच्या घोषणेला भाजपकडूनच हरताळ फासला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम यास दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेडाम यांच्या मातोश्री मोहिनी गेडाम या सिंदेवाही नगरपंचायतच्या भाजपच्या नगराध्यक्षा आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’02f08938-c1a6-11e8-b572-856601857003′]

गेडाम यांनी एका रेतिघाट कंत्राटदाराकडे रेतिघाट चालू देण्यासाठी 2 लाखांच्या लाचेची मागणी केली होती. कंत्राटदाराने याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. पैसे स्वीकारत असतानात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गेडाम यांना रंगेहाथ पकडले. चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’197a3043-c1a6-11e8-913d-710ed12796b0′]

सरकारी काम करण्यासाठी कोणताही लोकसेवक, लोकप्रतिनिधी लाचेची मागणी करत असल्यास त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंध विभागाने केले आहे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी