YES बँकेला गंडविणार्‍या उद्योजकांकडून भाजपाला कोट्यावधींची ‘देणगी’, AAPनं दाखवली यादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सन 2017 पासून रिझर्व्ह बँक सातत्याने येस बँकेचे निरीक्षण आणि चौकशी करीत आहे.या बँकेचा कारभार खूपच कमकुवत होता. ‘YES BANK ने मालमत्तेचे चुकीचे वर्गीकरण सुद्धा कारण्यात आले होते. त्यामुळेच भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जाचा एनपीए वाढल्याने येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली आहे. yes बँकेच्या थकबाकीदारांची यादी आम आदमी पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे.

Yes Bank चे संस्थापक राणा कपूर आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी परिचित आहेत. मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराच्या अँटिलियाशेजारी राणा कपूरच्या कुटुंबीयांनी १२७ कोटींचा बंगला विकत घेतला. लंडन मध्ये ही त्याची संपत्ती आहे त्याचबरोबर भारतात देखील खूप संपत्ती आहे. देशातील मोठ्या उद्योजकांशी या बँकेचे मोठे आर्थिक व्यवहार झाले असून हे उद्योजकच बँकेच्या डबघाईला कारणीभूत असल्याचे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.

अनिल अंबानी ग्रुपकडे येस बँकेचे 13 हजार कोटी रुपये आहेत. एसेल ग्रपकडे 3300 कोटींची थकबाकी आहे. डीएचएफएल ग्रुपकडे 3750 कोटी, रेडियस डेव्हलपर्सकडे 1200 कोटी, आरकेडब्लूकडे 1200 कोटी रुपयांची थकबाकी आहे. भाजपला वरील कर्जाची थकबाकी असलेल्या कंपन्यांकडून भाजपाला मोठ्या स्वरुपात देणगीही देण्यात आली आहे. अशी माहिती आम आदमी पक्षाकडून दिली आहे. खातेदारांना ५०,००० रुपये काढण्याचे लादलेले निर्बंध लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. सध्या ग्राहकाला खात्यातून फक्त 50 हजार रुपये काढता येत आहेत. त्याहून अधिकची रक्कम ग्राहक काढू शकत नाही. ग्राहकांच्या हिताचं संरक्षण लक्षात घेऊन निर्णय घेणार असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे.