भाजपला वर्षभरात 800 कोटींचा ‘फंड’ ! एकट्या TATA कडून 356 कोटी, ‘या’ 12 उद्योग समुहांनी दिले ‘एवढे’ कोटी

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – या वर्षी म्हणजेच 2018 – 19 मध्ये भारतीय जनता पक्षाला 800 कोटी रुपये इतका निधी अनेकांकडून मिळाला आहे. निवडणूक आयोगातील जमा कागदपत्रानुसार याबाबतची माहिती मिळाली आहे. भाजपने निवडणूक आयोगाला याबाबतची माहिती 31 ऑक्टोबर रोजी दिलेली आहे. यानुसार भाजपला चेक आणि ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून एकूण 800 कोटी रुपये मिळाले आहेत. या मानाने काँग्रेसला केवळ 146 कोटी रुपयेच मिळाले आहेत.

भाजपला 356 कोटी रुपये इतकी सर्वात जास्त रक्कम ही टाटा समूहाकडून मिळालेली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत असलेल्या द प्रूडेंट इलेक्टोरल ट्रस्ट कडून देखील भाजपला 67 कोटी रुपये मिळाले आहेत. याच ट्रस्ट कडून काँग्रेसला देखील 39 कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात आलेली आहे.

इलेक्टोरल ट्रस्टकडून काँग्रेसला 98 कोटी रुपये मिळालेले आहेत. भाजपला मिळालेल्या ऐकून रकमेपैकी 470 कोटी रुपये हे इलेक्टोरल ट्रस्टच्या माध्यमातून मिळाले आहेत. आदित्य बिरला समूहाकडून भाजपला 28 आणि काँग्रेसला 2 कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात आली आहे. ट्रिम्फ इलेक्टोरल ट्रस्टकडून भाजपला 5 कोटी रुपये, हार्मोनी ग्रुप कडून 10 कोटी रुपये, जनहित इलेक्टोरल ट्रस्ट आणि न्यू डेमोक्रेटिक इलेक्टोरल ट्रस्टने भाजपला प्रत्येकी 2.5 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे.

कोणत्या समूहाने दिला भाजपला किती निधी

हीरो समूह – 12 कोटी रुपये
आयटीसी – 23 कोटी रुपये
निरमा – 05 कोटी रुपये
प्रगति समूह – 3.25 कोटी रुपये
माइक्रो लॅब – 3 कोटी रुपये
बीजी शिरके कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी – 15 कोटी रुपये
आदि एंटरप्राइजेज – 10 कोटी रुपये
लोढा डेव्हलपर्स – 4 कोटी रुपये
मॉडर्न रोड मेकर्स – 15 कोटी रुपये
जेवी होल्डिंग्स – 5 कोटी रुपये
सोम डिस्टिलरीज – 4.25 कोटी रुपये

20 हजारांपेक्षा अधिक निधीची माहिती द्यावी लागते निवडणूक आयोगाला
वीस हजारांपेक्षा अधिक रक्कम निधीच्या स्वरूपात घेतलेली असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. बॉण्ड स्वरूपात घेतलेल्या निधींचाही यामध्ये समावेश आहे. जमा केलेल्या कागदपत्रानुसार भाजपला कंपन्यांकडून, उद्योगपतींकडून आणि निवडणूक ट्रस्टकडून देखील निधी मिळालेला आहे. नियमानुसार चालू आर्थिक वर्षांमध्ये मिळालेल्या निधीबाबत खुलासा करावा लागतो.

Visit : Policenama.com