भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत ‘गोतवळा’, ‘मुलं-मुली-सुना-जावाई’ आणि भाच्यांचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभेमध्ये काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपने आज विधानसभेच्या उमेदवारांच्या यादीमध्ये भाजपने नेत्यांचा मुलगा, जावई, सुन या सगळ्यांना उमेदवारी दिली आहे. आज भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये विद्यमान 12 आमदरांचा पत्ता कट करण्यात आला आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम मधून देवेंद्र फणवीस, कोथरुड चंद्रकांत पाटील, सतारा-शिवेंद्रराजे, कसबा – मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये एकनाथ खडसे, विनोद तावडे या नेत्यांची नावे नाही. एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. त्याचप्रमाणे गणेश नाईक यांचेही नाव नसल्याने गणेश नाईक यांना हा धक्का मानला जात आहे. यादीमध्ये एकनाथ खडसे यांचे नाव नसल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

भाजपने आज जाहीर केलेल्या यादीवर नजर टाकली तर घराणेशाहीचा अनेक उदाहरणे दिसतील. भाजपने नेत्यांचा मुलगा, मुली, जावई, सुना या सगळ्यांची नाव यांदीमध्ये आहेत.

पंकजा मुंडे – गोपीनाथ मुंडेंची मुलगी (परळी)
समीर मेघे – दत्ता मेघे यांचा मुलगा (हिंगणा )
राणा जगजितसिंह पाटील – पद्मसिंह पाटील यांचा मुलगा (तुळजापूर )
सिद्धार्थ शिरोळे – माजी खासदार अनिल शिरोळे यांचा मुलगा (शिवाजीनगर)
संतोष दानवे – रावसाहेब दानवे मुलगा (भोकरदन)
भारत गावित – माणिकराव गावित यांचा मुलगा (नवापूर)
संभाजी निलगेकर पाटील – माजी खासदार रुपताई निलंगेकर यांचा मुलगा (निलंगा)
हेमंत सावरा – विष्णू सावरांचा मुलगा
सुनील कांबळे – दिलीप कांबळेंचे भाऊ
देवयानी फरांदे – ना. स. फरांदे यांची सून (नाशिक मध्य )
आकाश फुंडकर – भाऊसाहेब फुंडकर यांचा मुलगा (खामगांव )
संदीप नाईक – गणेश नाईक मुलगा (ऐरोली)
वैभव पिचड – मधुकर पिचड यांचा (मुलगा अकोले)
मोनिका राजळे – माजी आमदार राजीव राजळे यांच्या पत्नी (शेवगाव)
राजीव राजळे – बाळसाहेब थोरात यांचे भाचे
अमल महाडिक – मुन्ना महाडीक यांचे भाऊ – कोल्हापूर दक्षिण
मदन भोसले – प्रतापराव भोसले यांचा मुलगा – वाई
स्नेहलता कोल्हे – शंकरराव कोल्हे यांची सून (कोपरगाव)
प्रशांत ठाकूर – माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा मुलगा (पनवेल)
अतुल भोसले – माजी आमदार दिलीपराव देशमुख यांचे जावई (दक्षिण कराड)

Visit : policenama.com 

You might also like