एकनाथ खडसे आणि विनोद तावडेंची ‘खलबतं’, ‘जाणून घ्या’ काय म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आणि भाजपाला पराभवास सामोरे जावे लागले. आणि यातूनच आता स्पष्ट बहुमताने आपण का निवडले नाही याची गोळाबेरीज केली तर काही दिग्गज नेत्यांची नावे पुढे येतात ज्यांना भाजपाकडून डावलण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने सांगायचे झाले तर भाजपानं एकनाथ खडसेंना जाणूनबुजून बाजूला ठेवले. आणि अनेक दिग्गजांना तिकीट नाकारण्यात आले ते म्हणजे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे. यामुळे या नेत्यांमध्ये आता नाराजीचा सूर साहजिकच दिसणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे अशा नेत्यांनी भाजपांतर्गत दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंची बैठक झाली आहे. या बैठकीनंतर एकनाथ खडसेंनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला.

बैठकीत झालेल्या चर्चेविषयी विचारल्यास खडसे म्हणाले, आमच्याकडे एक कार्यक्रम आहे. परिवारातल्या सदस्यांना आमंत्रण द्यायला बोलावलं होतं. तसेच भाजपासमोर काहीही आव्हानं नसल्याचाही त्यांनी खुलासा केला आहे. भाजपासमोर काहीही आव्हान नाही, पक्षामध्ये एकजूटता आहे आणि जस जशा निवडणुका येतील, त्या त्या वेळी योग्य काय ते दिसून येईल. मीडियाच्या माध्यमातून नको त्या अफवा पसरवल्या आहेत असे सांगून पंकजाताईंची भेट आम्ही घेतली असून गोपीनाथ गडावर दरवर्षीं जातो तसे यावर्षीही जाणार आहे. यासंदर्भात विनोद तावडेंना देखील विचारण्यात आले परंतु त्यांनी काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला.

तसेच भाजपाने कायम ओबीसी नेत्यांना संपविण्याचा डाव आखला असा आरोप भाजपाचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी भाजपावर केला आहे. त्यामुळे चर्चांना जोर आला आहे. तसेच ते म्हणतात की, भाजपा नेहमी ओबीसी नेत्यांना संपविण्याचा डाव आखते. गोपीनाथ मुंडे यांना पक्षातून काढून टाकण्याचा ठराव भाजपानेच केला होता. पण, आम्ही त्याला विरोध केला मग तो ठराव फेटाळण्यात आला असे देखील ते म्हटले.

तसेच त्यांनी सांगितले की, गोपीनाथ मुंडेंच्या मनात एक खदखद होती, ती खदखद त्यांनी जरी उघडपणे बोलून दाखवली नाही, पण वर्तमानपत्रातील नाराजीची बातमी ही सर्वत्र पसरली होती त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा देखील केला होता. तो म्हणजे, या काळात शिवसेनेचे तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी माझी दोनवेळा भेट घेतली. पण त्यांनी मला शिवसेनेत येण्याचा कुठलाही प्रस्ताव दिला नाही. गेल्या २२ वर्षांची आमची युती आहे, मी २००९ साली नाराज झालो होतो, तेव्हाही माझी नाराजी दूर करून तुम्ही भाजपातच राहिलं पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी मला सांगितल्याचं गोपीनाथ मुंडेंनी स्पष्ट केलं होतं. तसेच मुंडे त्यावेळी म्हटले होते की, माझ्याच पक्षातील काही लोकं अफवा पसरवत आहेत की मी शिवसेनेत किंवा काँग्रेसमध्ये जाणार आहे. त्यावेळेस गोपीनाथ मुंडे हे तत्कालीन काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचे जवळचे मित्र होते त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जातील असा विचारप्रवाह देखील एका बाजूला होता.

Visit : policenama.com