‘महाविकास’ आघाडीला भाजपचा ‘हा’ नेता थेट अंगावर घेणार, निवडला गेला विरोधी पक्ष नेता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्ता स्थापन करता न आल्याने आता भाजप विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहे. विधिमंडळात भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार नसून देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे असाच सामाना रंगणार आहे. भाजपने देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्ती केल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ऐकेकाळी सत्तेत एकत्र सत्तेत असलेले फडणवीस आणि उद्धव ठाकरे आता एकमेकांच्या विरोधात विधानसभेत दिसणार आहेत. कारण भाजपने विरोधी पक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे असाच सामना रंगताना आपल्याला पहायला मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय महानाट्या संपूर्ण देशाने पाहिले. यामुळे महाराष्ट्रात नेमकी कुणाची सत्ता येणार आणि मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत मोठं कुतूहल निर्माण झाले होते. अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या जोरावर मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला.

Visit : Policenama.com