भाजपमध्ये आलेल्यांचीही ED कडून चौकशी होऊ शकते : चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून ‘ईडी’ हे नाव संपूर्ण देशात चांगलेच चर्चेत आलेले आहे. अनेक दिवसांपासून ईडीकडून देशातील अनेक बड्या लोकांवर कारवाई करताना सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे ईडी संस्था सरकारच्या सांगण्यानुसार सूडबुद्धीने कारवाई करते असे अनेकांनी आरोपही केले होते. याच आरोपांना उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणतात, भाजपात प्रवेश केलेल्यांचीही ईडी चौकशी होऊ शकते.

चंद्रकांत पाटील म्हणतात, आपल्या देशात लष्कर, निवडणूक आयोग, आयकर विभाग अशा अनेक स्वायत्त संस्था आहेत. या विभागांकडून लगेच कोणाचीही चौकशी होत नाही वर्षभर आधी ते एखाद्याची रेकी करत असतात आणि मग त्यानंतर कारवाई करतात. राजकीय रागातून ईडीद्वारे चौकशी होते असेही नाही. त्यामुळे भाजपमध्ये आलेल्यांचीही ईडीने ठरवले तर चौकशी होऊ शकते.

कोल्हापूर शहर डीजे मुक्त झालेले आहे त्यामुळे पुणेही लवकर डीजे मुक्त करू असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच गणेश मंडळांनी डी जे विरोधात कारवाई केली नाही तर त्यांच्यावरच गुन्हे दाखल होतील असे पाटील यांनी पोलिसांना ठणकाहून सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –