BJP Ex-Corporator Vivek Yadav | पुणे कॅन्टोन्मेंटचे भाजपचे माजी नगरसेवक विवेक यादव यांना हाय कोर्टाचा दिलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Ex-Corporator Vivek Yadav | भाजपचे माजी नगरसेवक आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे (Pune Cantonment Board) माजी उपाध्यक्ष विवेक यादव (BJP Ex-Corporator Vivek Yadav) यांना मुंबई हाय कोर्टाकडून (Mumbai High Court) दिलासा मिळाला आहे. पूर्व वैमनस्यातून हत्येची सुपारी देण्याच्या आरोपातून विवेक यादव यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत MCOCA (Mokka Action) कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, आज यादव यांचा जामीन अर्ज हाय कोर्टाकडून मंजूर करण्यात आला आहे.

 

विवेक यादव (BJP Ex-Corporator Vivek Yadav) यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होती. यादव यांच्या जामीनाच्या अर्जावर अ‍ॅड. अनिकेत निकम (Adv. Aniket Nikam) यांनी युक्तिवाद केला. पोलिसांच्या तपासात आरोपीच्या ज्या फोनमध्ये घटनेबाबत जे व्हाटसअ‍ॅप मेसेज सापडले आहेत त्या फोनचा IMEI नंबर व CDR मधील IMEI नंबर यात तफावत आहे. तसेच, विवेक यादव यांना जरी टोळीप्रमुख दाखवले असले तरी यादव व इतर टोळीसदस्य यांचे कोणतेही एकत्रित इतर गुन्हे नाहीत तसेच सकृतदर्शनी मोक्का कायद्याची कलमे या गुन्ह्यास लागू शकत नाहीत.

त्याचबरोबर, कुठलाही हल्ला बबलू गवळी (Bablu Gawli) याच्यावर तथाकथित कटाप्रमाणे झाला नाही. आणि म्हणून यादव यांची जामीनावर मुक्तता करावी अशी विनंती यादव यांचे वकील अ‍ॅड. निकम यांनी केली. त्यानंतर सरकारी वकिलांनी यादव यांच्या जामीनास तीव्र विरोध केला. दरम्यान, न्यायाधीश सी. व्ही. भडंग (Justice C.V. Bhadang) यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अखेर जामीन मंजूर केला आहे.

 

नेमकं प्रकरण काय ?
बबलू गवळी आणि विवेक यादव यांच्यात पूर्वीपासून शत्रूत्व होते.
यादव याच्यावर बबलू गवळी याने 2016 साली गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत गोळीबार करून गंभीर जखमी केले होते.
त्याचा सूड घेण्यासाठी विवेक यादव यांनी राजन राजमनी या शिक्षा भोगत असणाऱ्या आरोपीला बबलू गवळीला मारण्यासाठी सुपारी दिली होती. यानंतर पूर्व वैमनस्यातून हत्येची सुपारी देण्याच्या आरोपातून यादव यांच्यावर जून 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

Web Title :- BJP Ex-Corporator Vivek Yadav | Former Pune Cantonment BJP corporator Vivek Yadav Mumbai Bombay High Court Crime News

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा