माजी आमदार मेधा कुलकर्णींनी घेतली मनेसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप-शिवसेना मुख्यमंत्री पदावरुन अडून राहिल्याने आता दोन्ही पक्षांकडून संख्याबळ जमावण्याचा प्रयत्न केला जात आहे. विधानसभेला मला अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर आल्या आहेत परंतू मी कुठेही जाणार नाही असे सांगण्याऱ्या मेधा कुलकर्णी यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. परंतू कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की माझ्या मुलीचा विवाह असल्याचे त्याचे निमंत्रण देण्यासाठी मी येथे आले आहे, ही कोणतीही राजकीय भेट नव्हती.

कोथरुडमध्ये माजी आमदार मेधा कुलकर्णी या 5 वर्ष आमदार होत्या. त्यानंतर चंद्रकांत पाटलांना सुरक्षित मतदारसंघ म्हणून पुण्याच्या कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उतरवण्यात आले होते. परंतू यामुळे विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट झाला. त्यावेळी मेधा कुलकर्णी यांनी बंडखोरी करुन पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवावी अशी गळ विरोधकांनी घातली होती परंतू त्याला मेधा कुलकर्णी यांनी नकार दिला होता.

त्यावेळी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या होत्या की माझ्या पाठीत खंजीर खुपसला तरी चालेल परंतू मी कोथरुड मतदारसंघातून चंद्रकात पाटील यांना विजयी करणार. परंतू 1 लाख मताधिक्यांने पाटील कोथरुडमधील निवडणूक येतील असा दावा फोल ठरला आणि ते फक्त 25 हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले.

मंगळवारी मेधा कुलकर्णी यांनी मुंबईत राज ठाकरेंची भेट घेतली, ही भेट जवळपास 25 मिनिटे चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणूकीवेळी देखील त्यांनी राज यांची भेट घेतली होती, परंतू आता पुन्हा एकदा भेट झाल्याने राजकीय तर्क वितर्क रंगवले जात आहेत.

परंतू यावर स्पष्टीकरण देत मेधा कुलकर्णी म्हणाल्या की माझ्या मुलीचे लग्न असल्याने त्याची पत्रिका देण्यासाठी मी राज ठाकरेंची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे. शिवसेना भवन येथे जाऊन पत्रिका देणार आहे. सर्वच राजकीय व्यक्तींना मी भेटत असून या भेटी माझ्या घरगुती कारणासाठी आहेत, यामागे कोणताही राजकीय हेतू नाही.

Visit : Policenama.com

नकारात्मक विचारांमुळे वाढू शकतो चिडचिडेपणा, ‘या’ 8 गोष्टींची काळजी घ्या
सर्वात फिट अ‍ॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो ? जाणून घ्या
स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे ‘हे’ 4 सोपे मार्ग, जाणून घ्या
सावधान ! वर्कआउटनंतर कधीही करु नका ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या
हातांचे सौंदर्य वाढवतात नखे, त्यांची काळजी ‘या’ 5 प्रकारे घ्या
तारूण्यातच द्या आरोग्याकडे लक्ष…अन्यथा मध्यमव्यासह म्हातारपणी होईल त्रास