Exit Poll 2019 : दिंडोरीत आयत्यावेळी उमेदवारी दिल्याने भाजप ‘कोमात’ तर राष्ट्रवादी ‘जोमात’

दिंडोरी : पोलीसनामा ऑनलाईन – सलग ३ वेळा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या हरिश्चंद्र पवार यांचा पत्ता कापून भाजपने आयत्यावेळी भाजपात दाखल झालेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपच्या गोटात काहीशी नाराजी होती. परंतु आदीवासी बहूल मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरीत खऱी लढत भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्ष यांच्यात होती. यावेळी भाजपला राष्ट्रवादी कॉंग्रेसने कांटे की टक्कर दिली आहे. हरिश्चंद्र पवार यांना आयत्यावेळी डावलून डॉ. भारती पवारांना उमेदवारी दिल्याने भाजपला याचा काहीसा तोटा झाल्याचे बोलले जात आहे.

दिंडोरी मतदारसंघात भाजपतर्फे डॉ. भारती पवार, राष्ट्रवादीतर्फे धनराज महाले आणि कम्यूनिस्ट पक्षातर्फे जीवा पांडू गावीत यांच्यात तिरंगी लढत रंगली. येथे वंचित बहुजन आघाडीने बापू बर्डे आणि माजी सनदी अधिकारी टी. के. बागूल यांचा फारसा प्रभाव पडलेला नाही.

चव्हाण समर्थकांची अडचण

सलग तीनवेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेल्या चव्हाण यांनी खूप उशीरापर्यंत प्रचारात सहभाग नोंदवला नव्हता. त्यामुळे भाजपची चिंता वाढली होती. तर समर्थकांचीही मोठी अडचण झाली होती.

काय होता २०१४ चा निकाल

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत हरिश्चंद्र चव्हाण यांचा विजय झाला होता. त्य़ांना २०१४ मध्ये ५ लाख ४५ हजार ७८४ मते पडली होती. तर आता भाजपची उमेदवारी मिळालेल्या भारती पवार यांना त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लढताना २ लाख ९५ हजार १८६ मते मिळाली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर कम्यूनिस्ट पक्षाचे हेमंत वाकचौरे यांना ७२ हजार ५९९ मते मिळाली होती.

असा आहे दिंडोरीतील इतिहास

२००८ च्या पुनर्रचनेनंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तत्पुर्वी तो मालेगाव मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. त्यावेळी तो जनता दलाचा गड मानला जात होता. १९५७ मध्ये य़ेथून समजावादी पक्षाचे यादव नारायण जाधव तर १९६२ मध्ये कॉंग्रेस सत्तेत आली. त्यावेळी जाधव यांना विजय मिळाला. तर १९६७ आणि १९७१ मध्ये झामरू मंगलू कहांडोल यांना कॉंग्रेसकडून विजय मिळाला. १९७७ मध्ये भारतीय लोक दलाच्या तिकीटावर हरिभाऊ महाले. तर १९८० मध्ये कॉंग्रेसच्या तिकीटावर झामरू मंगलू कहांडोल यांना पुन्हा विजय मिळाला. १९८४ मध्ये कॉंग्रेसच्या सीताराम भोये यांनी तर १९८९ मध्ये हरिभाऊ महाले यांना जनता दलाच्या तिकीटावर विजय मिळाला. १९९१ मध्ये कहांडोल, १९९६ मध्ये कचरू भाऊ राऊत यांनी भाजपकडून निवडणूक जिंकली. परंतु १९९८ मध्ये कॉंग्रेसचे झामरू मंगलू कहांडोल तर १९९९ मध्ये हरिभाऊ महाले जनता दलाकडून जिंकले होते. यापुर्वी २००४ मध्ये हरिश्चंद्र चव्हाण यांना विजय मिळाला होता. तर दिंडोरी मतदारसंघ तयार झाल्यानंतर २००९ आणि २०१४ मध्ये त्यांनी सलग विजय मिळविला.

Loading...
You might also like