खंडणीसाठी बिल्डर हल्ला केल्या प्रकरणी माजी महापौराला अटक

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन  – बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या हल्ला प्रकरणी गेल्या ४ महिन्यांपासून फरार असलेले माजी महापौर ललीत कोल्हे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरा श्रद्धा कॉलनीतून अटक केली.

गेली चार महिने कोल्हे हा पोलिसांना हुलकावणी देत होता. सरिता माळी यांच्या घरी कोल्हे लपून बसला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी रात्री माळी यांच्या घरावर छापा टाकला. पोलीस आल्याचे समजताच कोल्हे हा घराच्या गच्चीवर जाऊन लपून बसला होता. तेथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर १६ जानेवारी २०२० रोजी गोरजाबाई जिमखान्याजवळ कोल्हे व त्याच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणात भाजप नगरसेवकासह ५ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. मात्र कोल्हे पोलिसांना सापडत नव्हता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like