Corona Lockdown : ‘लॉकडाऊन’ दरम्यान माजी खासदारांच्या गाडीतून फिरणार्‍या दोघांना पोलिसांकडून ‘पाहुणचार’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे राज्यभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. असे असतानाही भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या कारमधून फिरणार्‍या दोघांना अहमदनगर पोलिसांनी काठ्यांचा मार दिला आहे. एवढेच नाही तर त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला आहे.

संचारबंदीच्या काळात ’माजी खासदार’ असं नंबर प्लेटवर लिहिलेल्या कारमधून फिरणार्‍या दोघांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेउन त्यांना यथेच्छ काठ्यांचा प्रसाद दिला.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे स्वतः शहरातील धरती चौकात रस्त्यावर उतरत कर्फ्युत विनाकारण फिरणार्‍या नादान नागरिकांवर कारवाई करत होते. वाहनचालक अत्यावश्यक सेवेत नसल्याचे लक्षात येताच एकीकडे पोलिस काठ्यांचा प्रसाद देत होते. गाडीची हवा सोडण्याबरोबर कायदेशीर कारवाई पण करत होते. अशात एमएच 16-बीपी 2121 असा नंबर असलेली माजी खासदार दिलीप गांधी यांची आलिशान चारचाकी वाहन जिल्हाधिकार्‍यांनी अडवले. कारच्या नंबर प्लेटवर कमळाच्या चिन्हासह माजी खासदार असे लिहिलेले होते.

मात्र, गांधी या गाडीत स्वतः नव्हते. जंतूनाशकाची फवारणी करण्यासाठी गेले असल्याचे या गाडीत असलेल्या रोशन विजयकुमार गांधी आणि कपिल पंढरीनाथ माने यांनी सांगितले. खात्री न पटल्यामुळे पोलिसांनी या दोघांना यथेच्छ काठ्यांचा प्रसाद दिला. तसेच वाहनातील या दोघांवर कलम 188 प्रमाणे कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची आणि माझी बदनामी होईल या उद्देशाने केल्याचा आरोप दिलीप गांधी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे, याबाबत आपण माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी स्वतः मोठा पोलीस फौजफाटा सोबत घेऊन कसलेही सोशल डिस्टनसिंग न पाळता फिरत आहेत.

मात्र, मी पक्षाच्या आदेशाने सामाजिक बांधिलकीतून मोफत अन्न, औषध फवारणी यासाठी काम करत असताना प्रशासनाने जाणीवपूर्वक माझ्या स्वीयसहायक आणि ड्रायव्हरवर मारहाण करत कारवाई केल्याचे दिलीप गांधी यांनी म्हटले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like