भाजपमध्ये दुसर्‍यांदा मेगा भरती ! १० ऑगस्ट रोजी ‘त्या’ इतरआमदारांचा प्रवेश

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभेच्या तोंडावर भाजपमध्ये अनेक आमदारांनी प्रवेश केला असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन आमदार आणि एका काँग्रेस आमदाराचा देखील काल भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. या आमदारांमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार भाजपमध्ये प्रवेश करत असताना आता पुन्हा १० ऑगस्ट रोजी देखील भाजपमध्ये मेगा भरती होणार आहे. काल ज्या नेत्यांना पक्षात प्रवेश करता आला नाही अशा नेत्यांना १० ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. आजपासून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सुरु होत असून यामध्ये देखील अनेक विरोधी पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक मोठ्या नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. पक्षात प्रवेश केलेल्या आमदारांना आणि नेत्यांना योग्यतेप्रमाणे योग्य ते पद आणि स्थान दिले जाईल असेदेखील मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

भाजप धर्मशाळा नाही

शरद पवार यांच्या धमक्या देऊन आमदार पळविण्याच्या आरोपांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि, भारतीय जनता पक्ष ही धर्मशाळा नसून कुणालाही भाजपात प्रवेश दिला जात नसून आम्हाला कोणत्याही आमदाराला धमकावण्याची काहीही गरज नाही. आमदार स्वतःहून आमच्या पक्षात येण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र चांगले काम करणाऱ्या आमदारांना आम्ही प्रवेश देत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. पूर्वी भाजप कार्यकर्ते दुसऱ्या नेत्यांच्या मागे फिरत असतं मात्र आता परिस्थिती बदलली असल्याने कार्यकर्ते देखील आनंदी आहेत.

दरम्यान, आम्ही कुणालाही पक्षात प्रवेश देत नसून आमदार आणि नेत्यांचे कर्तृत्व पाहूनच आम्ही त्यांना प्रवेश देत असून ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची चौकशी चालू आहे अशा नेत्यांना आम्ही पक्षात प्रवेश देणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –