भाजपला मोठा धक्का: 30 आमदार काँग्रेसच्या संपर्कात

भोपाळ : पाेलीसनामा ऑनलाईन

मध्यप्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे ३० आामदार काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, असा दावा मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहीती दिली आहे.
[amazon_link asins=’B07DRJ4HD6,B077ZXRB5W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’16895d2c-ba6e-11e8-9fa4-71fc87e8b57e’]

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ इंदौर दौऱ्यावर आहेत. त्यांनी तिथे पदयात्रा काढून काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा दावा केला आहे. तसंच राज्यातील २ हजारपेक्षा जास्त उमेदवार तिकीटासाठी इच्छुक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
[amazon_link asins=’B078124279,B077ZZ83ZS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’240f6e2c-ba6e-11e8-a197-85942948288a’]

राज्यात एकूण 230 विधानसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडे 2,500 लोकांनी दावा केला आहे. ज्यामध्ये 30 भाजप आमदारांचा समावेश आहे. भाजपचे आमदार माझ्या संपर्कात आहेत. ते माझ्या संपर्कात का आहेत याबाबत मी काही नाही सांगू शकत. दोन वेगवेगळ्या एजेंसींकडून सर्वेक्षण केल्यानंतर त्याच्या आधारावर जे विजयी होतील अशा व्यक्तींना तिकीट दिलं जाईल.” असं कमलनाथ यांनी सांगीतलं आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.