नेटकऱ्यांकडून भाजपवर टीका ! आयारामांसाठी पायघड्या, निष्ठावंत ‘रखडले’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 125 उमेदवरांची पहिली यादी जाहीर केली. जाहीर केलेल्या यादीमध्ये 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. या यादीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण-पश्चिम तर महसूल मंत्री चंद्राकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. परंतु भाजपच्या निष्ठावंत नेत्यांना पहिल्या यादीतून वगळण्यात आले आहे तर आयारामांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावरून सोशल मीडियावरून भाजपवर टीका होत आहे.

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये एकनाथ खडसे, प्रकाश मेहात, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्या नावाचा समावेश नाही. तर इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या 13 आयारामांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजप सध्या आयारामांसाठी पायघड्या घालत आहे तर पक्षनिष्ठांना रखडवून ठेवत आहे, अशी टीका नेटकऱ्यांनी करण्यास सुरुवात केली आहे.

भाजपने 13 आयारामांना उमेदवारी देऊन त्यांना खूष केले आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून भाजपशी निष्ठावान असलेल्या एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रकांत बावनकुळे आणि प्रकाश मेहता यांना उमेदवारी दिलेली नाही. त्यातच भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये एकनाथ खडसे यांचे नाव नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खडसे, तावडे आणि मेहता यांना ट्रोल करणारे अनेक मसेज आणि मीम्स व्हायरल होत आहेत.

भाजपच्या पहिल्या यादीत समावेश केलेले आयाराम
1. हर्षवर्धन पाटील – काँग्रेस
2. राधाकृष्ण विखे पाटील – काँग्रेस
3. कालिदास कोळंबकर – काँग्रेस
4. प्रशांत ठाकूर – काँग्रेस
5. रवी पाटील – काँग्रेस
6. मदन भोसले – काँग्रेस
7. जयकुमार गोरे – काँग्रेस
8. विजयकुमार गावित – राष्ट्रवादी
9. गणेश नाईक – राष्ट्रवादी
10. वैभव पिचड – राष्ट्रवादी
11. बबनराव पाचपुते – राष्ट्रवादी
12. राणा जगजितसिंह पाटील – राष्ट्रवादी
13. शिवेंद्रसिंहराजे भोसले – राष्ट्रवादी