भाजपला देशातील १७३१ कार्पोरेट कंपन्यांकडून ९१५ .५९ कोटी रुपयांची ‘देणगी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पार्टीला देशातील विविध १ हजार ७३१ कार्पोरेट कंपन्यांनी तब्बल ९१५ .५९ कोटी रुपयांची ‘देणगी’ दिल्याची बाब उघडकीस आली आहे. इतकेच नाही तर सर्व राजकीय पक्षांना मिळालेल्या या देणगीमधील सर्वाधिक रक्कम ही भाजपच्या ‘ खात्या’त
गेली आहे. काँग्रेसला १५१ कार्पोरेट कंपन्यांनी ५५. ३६ कोटी रुपयांचा ‘ हातभार’ लावला आहे, तर राष्ट्रवादीला २३ कार्पोरेट कंपन्यांकडून ७.७४ कोटी रुपये देणगी स्वरूपात मिळाले आहेत.

राजकीय पक्षांना सर्वाधिक कॉर्पोरेट क्षेत्राकडून देणग्या देण्यात आल्या आहेत. हे प्रमाण ९३ टक्के असून देशातील सहा राजकीय पक्षांनी कोट्यवधींची रक्कम कॉर्पोरेट क्षेत्राकडून स्वीकारल्याचे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. सर्वात कमी म्हणजे २ टक्के देणग्या कम्युनिस्ट पक्षाला (सीपीआय) मिळाल्या आहेत.

राष्ट्रीय पक्षांना विविध ७६ संस्थांकडून २.५९ कोटींच्या देणग्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या पॅन क्रमाकांची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तसेच भाजपला मिळालेल्या २.५० कोटींच्या देणग्या देणाऱ्यांचे पत्ते आणि पॅन क्रमांकही उपलब्ध नाहीत. देशातील सहा राष्ट्रीय पक्षांना २२.५९ कोटींच्या ३४७ देणग्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून मिळाल्या आहेत. मात्र त्या कंपन्यांचा इंटरनेटवर ठावठिकाणाही नाही. ते काय काम करतात, याबाबत शंका असल्याचे ‘एडीआर’ने म्हटले आहे.

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

पावसाळ्यात घ्या या ‘५’ पद्धतीने ओठांची काळजी

अधिक प्रमाणात तुपाचे सेवन शरीरासाठी हानिकारक ; जाणून घ्या ‘योग्य मात्रा’

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य