भाजप सरकारला शेतकरी घरी बसवणार : खासदार राजू शेट्टी   

पुणे पोलीसनामा ऑनलाइन

मागील चार वर्षाच्या काळात केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विषयी निर्णय घेण्यात अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या मतावर हे सरकार आले असून त्यांना सत्ताधारी विसरले आहे. अशा शब्दात खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. तर या शेतकरी विरोधी सरकारला हेच शेतकरी घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा देखील पुण्यातील मोर्चा दरम्यान त्यांनी दिला.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d57dc2b8-7b7c-11e8-ac3f-f75194dbc254′]

राज्यातील ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आज पुण्यात अलका चौक ते साखर संकुल दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राज्यातील विविध भागातील शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान मोर्चामध्ये सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची साखर कारखानदारांनी एफआरपी दिली नाही. ती त्वरित द्यावी तसेच साखर आयुक्तांनी कारखाना मालकाची मालमत्ता जप्त करावी. त्याच बरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट असून या सरकारने लिटर मागे पाच रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे. अशी मागणी अनेक वेळा सरकारशी पत्रव्यवहार केला. तरी देखील या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने हा मोर्चा काढावा लागला आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल. अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.