अंतर्गत कलहाने महाविकासचं सरकार कोसळणार, भाजपचं सरकार लवकरच येणार असल्यानं चिंता नको : चंद्रकांत पाटील

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत महायुतीचा आकडा १८६ इतका होऊनसुध्दा आम्ही सरकार स्थापन करू शकलो नाही. परंतु आमच्या मित्रपक्षाने वेगळी वाट धरून फसव्या पद्धतीने सरकार स्थापन करून सत्तेत आलेले आहेत. परंतु सत्तेत आलेलं सरकार हे फसवं सरकार असुन या सरकारमधील अंतर्गत वादविवादामुळे हे सरकार लवकरच कोसळणार आहे. अनवधानाने सत्तेत आलेल्या सरकारचा कालावधी लवकरच संपणार असून यानंतर भाजप सरकार महाराष्ट्रात सत्तेत येणार असुन इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी चिंता करण्याचे कारणच नाही. कारण भाजप सरकारमध्ये हर्षवर्धन पाटील यांना नक्की संधी मिळणार असल्याची ग्वाही माजी महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी इंदापूर येथे बोलताना दिली.

कृृषि उत्पन्न बाजार समिती इंदापूर आयोजित भव्य कृषि, जनावरे प्रदर्शन, घोडे बाजार व डाॅग शो प्रदर्शनाचे उदघाटन चंद्रकांत पाटील यांचे हस्ते बुधवार दिनांक ८ जानेवारी रोजी दुपारी करण्यात आले त्यावेळी ते बोलत होत. यावेळी राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, अकलुज कृृृृषि ऊत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, पृृृथ्विराज जाचक, राजवर्धन पाटील, पंचायत समितीच्या सभापती, पुष्पाताई रेडके, मयुरसिंह पाटील, अ‍ॅड. कृृृष्णाजी यादव, नाना शेंडे, विलास वाघमोडे, मंगेश पाटील, अरविंदतात्या वाघ, शिवाजी इजगुडे, रोहित मोहोळकर इत्यादी प्रमुख माण्यवर उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की सर्वांना चिंता ताहे की हर्षवर्धन पाटील यांचे काय होणार. परंतु तुम्ही त्यांची काळजी करू नये. त्यांची काळजी करण्यास देवेंद्र फडणवीस तयार आहेत. भारतीय जनता पार्टी कोणालाही वार्‍यावर सोडत नाहीत. हे सरकार लवकरच पडेल. आत्ताच्या सरकारमधील नाराज मंत्री वडेट्टीवार हे दोन दिवसापासुन गायब आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे नव्या सरकारमधील वाढता अंतर्गत कलह असुन यामुळे हे सरकार किती दिवस टिकणार आहे हे सर्वांनाच माहीत असुन लवकरच भाजपचे सरकार राज्यात पुन्हा येणार असुन हर्षवर्धन पाटील यांना त्यामध्ये स्थान असेल असे पाटील यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

महाराष्ट्रात यावर्षी अवेळी पावसाने नुकसान झाले असून नुकसाणीची पाहणी उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन केली होती. शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. परंतु उद्धव ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर अद्यापपर्यंत एक रूपयाही शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली नाही. कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी दिली आहे. यांना पीककर्ज व मध्यम मुदतीचे कर्जातील फरक अजून कळत नाही, की सातबारा व फेरफार मधील फरक कळत नाही हे सरकारच फसवे असुन अप्पासाहेब जगदाळे यांच्यामाध्यमातुन इंदापूरात भरविण्यात आलेले कृृृषि प्रदर्शन हे शेतकर्‍यांच्या हिताचे असुन यामुळे शेतकर्‍यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी हर्षवर्धन पाटील अध्यक्ष पदावरून बोलताना म्हणाले की इंदापूर कृृृृषि उत्पन्न बाजार समितीचे यंदाचे ३ रे वर्ष आहे. महाराष्ट्रात या प्रदर्शनाचा दुसरा क्रमांक लागतो. पुढच्या वेळी प्रथम क्रमांकासाठी प्रयत्न करू असे पाटील यांनी सांगितले. तर या प्रदर्शनाच्या माध्यमातुन शेतकर्‍यांनी नवीन टेक्नाॅलाॅजीचा वापर करून आधुनिक शेती बनवावी असे सांगून खाऊ गल्लीचे विशेष कौतुक केले. कृृृृषि प्रदर्शन हे तालुक्यातील शेतकर्‍यांना वरदान ठरत असुन अप्पासाहेबांच्या मुळे शेतकर्‍यांना मोठा फायदा होत आहे. २०१९ च्या विधानसभेला आम्ही थोडे कमी पडलो परंतु येणार्‍या काळात इंदापूर तालुका, माळशिरस तालुका आपल्या पाठिशी ठामपणे राहील असे आश्वासन दिले. तर प्रस्ताविक करताना इंदापूर कृृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे म्हणाले की आम्ही या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिला. हर्षवर्धन पाटील व रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षात जबाबदारी देऊन त्यांचा सन्मान करावा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/