‘या’ राज्यात होणार मोफत ‘कोविड’ टेस्ट

भोपाल : वृत्तसंस्था –   देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशातील प्रत्येक राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी चाचण्या वाढवण्याची मागणी केली जात आहे. अशातच मध्य प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोना व्हायरस चाचणीसाठी नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचे शुक्ल आकारले जाणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मध्य प्रदेशात यापुढे कोरोना संसर्गाची तपासणी मोफत करण्यात येईल. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यात मोफत कोरोना टेस्ट करण्यासाठी फिव्हर क्लीनिकची संख्या वाढवण्यात येणार आहे. तसेच ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवून 3700 पर्यंत करण्यात येणार आहे. याशिवाय प्रदेशात ऑक्सिजन बेड्सची संख्या 11700 पर्यंत करण्यात येणार आहे. दुसरीकडे सरकारने 700 आयसीयू बेड्स वाढवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला.

राज्यातील ग्वालिअर आणि जबलपूरमध्ये बेड्सची संख्या सर्वात वाढविण्यात येईल. कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने कोरोना संसर्गासाठी प्रदेशभरात जागरुकता अभियान चालविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नगरीय आणि पंचायत विभाग, शहर आणि गावात प्रचार अभियान सुरु करण्यात येईल. सरकारने दावा केला आहे की, सध्या 30 हजार बेड्स आहेत. याची संख्या वाढविल्याने रुग्णांवर उपचार करणे सोपे होणार आहे.